Chennai Super Kings 4th Defeat esakal
IPL

CSK vs SRH : चेन्नईचा पराभवाचा चौकार; हैदराबादने खाते उघडले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलच्या 17 व्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा विकेट्सनी पारभव करत हंगामातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. चेन्नई सुपर किंग्जचे 154 धावांचे आव्हान हैदराबादने आरामात पार केले. हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्माने 50 चेंडूत 75 धावांची दमदार खेळी केली. त्याला पहिल्यादा कर्णधार केन विल्यमसनने (32) चांगली साथ दिली. त्यानंतर राहुल त्रिपाठीने 15 चेंडूत 39 धावा चोपून हैदराबादचा विजय सोपा केला.

चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 154 धावा केल्या होत्या. त्यांचा पाठलाग करताना सनराईजर्स हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी 89 धावांची सलामी दिली. अभिषेक एका बाजूने आक्रमक फलंदाजी करत होता तर दुसऱ्या बाजूने केन विल्यमसन सावध खेळून त्याला साथ देत होता. दरम्यान, मुकेश चौधरीने 32 धावांवर खेळणाऱ्या विल्यमसनला बाद करत ही जोडी फोडली. मात्र त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीने आपल्या नैसर्गिक आक्रमक शैलीत तुफान फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. अभिषेकने देखील अर्धशतकानंतर आपला वेग वाढवला. मात्र विजयासाठी 10 धावांची गरज असताना अभिषेक शर्मा 75 धावांवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर त्रिपाठी आणि निकोलस पूरनने विजयाची औपचारिकता 18 व्या षटकात पूर्ण केली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी पॉवर प्लेमध्येच आपले दोन्ही सलामीवीर गमावले. ऋतुराज गायकवाड 16 तर रॉबिन उथप्पा 15 धावा करून बाद झाले. त्यानंतर रायुडू (27) आणि मोईन अलीने (48) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोक्याच्या क्षणी हे दोघेही बाद झाले. त्यानंतर आलेल्या धोनी आणि शिवम दुबे हे प्रत्येकी 3 धावा करून माघारी फिरले. अखेर रविंद्र जडेजाने 15 चेंडूत 23 धावा ठोकत सीएसकेला 150 च्या जवळ पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

SCROLL FOR NEXT