Chennai Super Kings Gifted MS Dhoni framed Fan Letter ESAKAL
IPL

धोनीला चेन्नईने फॅनच्या लेटरची फ्रेम केली गिफ्ट; धोनी म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

महेंद्रसिंह धोनीवर (Mahendra Singh Dhoni) त्याचे चाहते जीव ओवाळून टाकतात. याचाच फायदा चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) त्यांचा फॅनबेस वाढवण्यासाठी झाला आहे. धोनीची अशीच एक फॅन मोमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नईने आज धोनीचा एक फोटो शेअर केला. फ्रेंचायजीने एका चाहत्याने लिहिलेले एक पत्र फ्रेम करून (Framed Fan Letter) ते धोनीला गिफ्ट केले. धोनीने या फ्रेमवर फक्त हस्ताक्षर केले नाही तर त्यावर 'खूप छान लिहिले आहे. भविष्यासाठी शुभेच्छा.' असा संदेश देखील लिहिला.

धोनी हा चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख चेहरा आहे. त्याच्याच नेतृत्वात चेन्नईने चारवेळा आयपीएलच्या विजेतेपदरावर नाव कोरले. ज्यावेळी आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीने संघाचे नतृत्व सोडले होते त्यावेळी त्याच्या चाहत्यांची खूप निराशा झाली होती. मात्र हंगामाच्या मध्यावर रविंद्र जडेजाने नेतृत्व पुन्हा धोनीकडे सोपवले.

धोनी पुन्हा एकदा संघाचा कर्णधार झाल्यानंतर चेन्नईने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर सीएसकेच्या फॅन्सच्या जीवात जीव आला होता. धोनी पुन्हा कर्णधार झाल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला होता. दरम्यान, रविंद्र जडेजाने दुखापतीमुळे आयपीएल सोडली. सध्या सीएसके गुणतालिकेत चार सामने जिंकून नवव्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT