CSK vs RR IPL 2023  esakal
IPL

CSK vs RR IPL 2023 : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईला दिली 3 धावांनी मात

अनिरुद्ध संकपाळ

CSK vs RR IPL 2023 :  चेन्नईला विजयासाठी 1 चेंडूत 5 धावांची गरज होती. समोर होता धोनी! याच षटकात धोनीने दोन षटकार खेचत सामना सीएसकेच्या पारड्यात आणला होतो. मात्र आता तो 2010 चा काळही राहिला नाही आणि तो व्हिंटेज धोनीही! संदीप शर्माने धोनीला हात खोलण्याची संधी न देता शेवटचा चेंडू चांगला टाकत फक्त 2 धावा दिल्या अन् सीएसके फॅन्सचा जल्लोषाचा आनंद हिरावून घेतला.

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने 20 षटकात 8 बाद 175 धावा केल्या. सलामीवीर जॉस बटलरने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला देवदत्त पडिक्कलने 38 तर अश्विन आणि हेटमायरने प्रत्येकी 30 धावा करत चांगली साथ दिली. सीएसकेकडून आकाशदीप, तुषार देशपांडे आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

142-5 : बटलर अर्धशतकानंतर झाला बाद 

रविंद्र जडेजाने दोन धक्के दिल्यानंतर बटलर आणि अश्विनने चौथ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी रचली. मात्र त्यानंतर आकाश सिंगने अश्विनला 30 धावांवर बाद झाला. त्यानंतर मोईन अलीने 36 चेंडूत 52 धावा करणाऱ्या बटलरचा त्रिफळा उडवला.

  88-3  : रविंद्र जडेजाचा डबल धमाका

जैसवाल बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि जॉस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 77 धावांची दमदार भागीदारी रचली. मात्र ही जोडी रविंद्र जडेजाने तोडली. त्याने पडिक्कलला 38 धावांवर बाद केले. त्यानंतर संजू सॅमसनला भोपळाही फोडू दिला नाही.

RR 45/1 (5) : पहिल्या धक्क्यानंतरही आरआरची चांगली सुरूवात

तुषार देशपांडेने यशस्वी जैसवालला 10 धावांवर बाद केल्यानंतर जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघाला 5 षटकात 45 धावांपर्यंत पोहचवले.

चेन्नईने नाणेफेक जिंकली

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅप्टन कूल @200चेच

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी कर्णधार म्हणून आज चेन्नईकडून 200 वा सामना खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव आयपीएल कर्णधार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT