CSK vs SRH  esakal
IPL

CSK vs SRH IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जने हैदराबादला दिली 7 विकेट्सनी मात

अनिरुद्ध संकपाळ

CSK vs SRH IPL 2023 Live : चेन्नई सुपर किंग्जने सनराईजर्स हैदराबादचा 7 विकेट्स आणि 8 चेंडू राखून पराभव करत 8 गुण मिळवले. हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 135 धावांचे आव्हान सीएसकेने 19 व्या षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. चेन्नईकडून डेवॉन कॉन्वेने 57 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. त्याला ऋतुराज गायकवाडने 35 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी 87 धावांची दमदार सलामी दिली.

तत्पूर्वी, सनराईजर्स हैदराबादने 20 षटकात 7 बाद 134 धावाच करत चेन्नईसमोर विजयासाठी 135 धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने भेदक मारा करत 4 षटकात 22 धावा देत 3 बळी घेतले. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 34 धावा केल्या.

110-2 : चेन्नईला दमदार सुरूवातीनंतर दोन धक्के

सनराईजर्स हैदराबादचे 135 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उरतलेल्या सीएसकेने दमदार सुरूवात केली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड यांनी पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरूवात केली. कॉन्वोने आक्रमक तर ऋतुराज त्याला साथ देत होता. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली.

त्यानंतर ऋतुराज गायकवाड 35 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे देखील 10 चेंडूत 9 धावा करून माघारी फिरला.

134-7 (20 Ov) : हैदराबादचे सीएसकेसमोर माफक आव्हान

सनराईजर्स हैदराबादने 20 षटकात 7 बाद 134 धावाच करत चेन्नईसमोर विजयासाठी 135 धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने भेदक मारा करत 4 षटकात 22 धावा देत 3 बळी घेतले.

97-5 (14 Ov) : रविंद्र जडेजाने पाडले खिंडार

रविंद्र जडेजाने अभिषेक शर्माला बाद केल्यातनंतर 21 धावा करणाऱ्या राहुल त्रिपाठी आणि मयांक अग्रवाल यांना देखील बाद करत हैदराबादची अवस्था 5 बाद 97 धावा अशी केली.

SRH 71/2 (9.2) : हैदराबादची चांगली सुरूवात

प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र आकाश सिंहने हॅरी ब्रुकला 18 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादला 10 षटकात 71 धावांपर्यंत पोहचवले. मात्र रविंद्र जडेजाने अभिषेक शर्माला 34 धावांवर बाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला.

चेन्नईने नाणेफेक जिंकली. 

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT