Mike Hesson Clarify When Glenn Maxwell Joining RCB esakal
IPL

ग्लेन मॅक्सवेल आरसीबीकडून कधी खेळणार; कोच माईक हेसनने केला खुलासा

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : रॉयल चॅलेंजर बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आज राजस्थान रॉयल्ससोबत (Rajasthan Royals) भिडणार आहे. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) नुकतेच आपले लग्न उरकून घेतले आहे. त्यामुळे तो आरसीबीच्या कळपात धडाकेबाज मॅक्सवेल कधी सामील होणार याची आरसीबीचे चाहते वाट पाहत आहेत. दरम्यान, आरसीबीचे प्रमुख कोच माईक हेसन (Mike Hesson) यांनी ग्लेन मॅक्सवेल आरसीबीच्या संघात कधी परतणार याबाबत खुलासा केला.

आरसीबीचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल खास सामन्यात आरसीबीकडून खेळणार आहे. 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध ग्लेन मॅक्सवेल आपल्या आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरूवात करेल. सध्या ग्लेन मॅक्सवेल आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत संघात सामील झाला आहे. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी असलेल्या अटींमुळे तो आजच्या राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही.

मॅक्सवेल पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा सदस्य नाही. मात्र यंदाच्या आयपीएल सत्रात त्याला खेळण्यासाठी सहा एप्रिलची वाट पहावी लागणार आहे. हेसनने आरसीबीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हणाले की, 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (Cricket Australia) स्पष्ट म्हणणे आहे की कोणताही करार केलेला खेळाडू सहा एप्रिलच्या पूर्वी आयपीएल सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल संघात कधी दाखल झाला याला महत्व नाही. तो 6 एप्रिल नंतरच खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

मॅक्सवेल पुढे म्हणाला, 'बाकीच्या संघांप्रमाणेच या गोष्टीची आम्हाला देखील जाणीव आहे. आम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवूनच प्लॅनिंग केले आहे. मॅक्सवेल 9 एप्रिलपासून आरसीबीसाठी उपलब्ध असेल.' आरसीबीने यंदाच्या हंगामात दोन सामने खेळले आहेत त्यातील एक सामना जिंकला आहे तर एक गमावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी

SCROLL FOR NEXT