Controversy over IPL match MI vs SRH  esakal
IPL

IPL सामन्यावरून तुंबळ हाणामारी; कोल्हापुरातील जखमीचा मृत्यू, रोहित शर्मा आऊट होताच केली होती मस्करी

हणमंतवाडी (ता.करवीर) येथे दोन गटात बुधवारी रात्री आयपीएल सामन्यावरून (IPL Match) तुंबळ हाणामारी झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

टीव्हीवर आयपीएल क्रिकेटचा (IPL Cricket) सामना बघत असताना, बुधवारी रात्री दहाच्या सुमारास बंडू तिबिले व बळवंत झांजगे यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली आणि त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले.

शिंगणापूर : हणमंतवाडी (ता.करवीर) येथे दोन गटात बुधवारी रात्री आयपीएल सामन्यावरून (IPL Match) तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी बळवंत झांजगे व सागर झांजगे या चुलत्या- पुतण्यांनी लाकडी फळी व काठीचा वापर करत बंडोपंत बापू तिबिले यांना गंभीर जखमी केले होते.

त्यांच्‍यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना काल त्‍यांचा मृत्यू झाला. हणमंतवाडी येथे टीव्हीवर आयपीएल क्रिकेटचा (IPL Cricket) सामना बघत असताना, बुधवारी (ता.२७) रात्री दहाच्या सुमारास बंडू तिबिले व बळवंत झांजगे यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली आणि त्याचे रूपांतर बाहेर आल्यानंतर मोठ्या भांडणात झाले.

बळवंत झांजगे व त्यांचा पुतण्या सागर झांजगे यांच्या मारहाणीने तिबिले गंभीर जखमी झाले होते. तिबिले यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान संशयित सागर झांजगे व बळवंत झांजगे यांना जिल्हा न्यायालयाकडून पोलिस कोठडी (Police Custody) देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलेंडर 587 रुपयाने स्वस्त... 10 कोटींहून अधिक लोकांना कसा होत आहे फायदा?

कंगनाच्या आईवडिलांनी तिचे सिनेमे कधीच पाहिले नाही? पहिल्या सिनेमाची आठवण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'त्यांना फक्त बोल्ड सीन्स अन्...'

Maharashtra Dams: राज्यातील धरणांतील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा ३ टक्क्यांनी घटला; केवळ २७ टक्के उपयुक्त साठा शिल्लक, पावसाआधीच पाण्याची चिंता वाढली

Kolhapur Crime : महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद २५ हून अधिक वाहने फोडली; तलवारी, एडके घेऊन केली दहशत

CM Gram Sadak Yojana: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ग्रामीण रस्त्यांसाठी ६,४२९ कोटींचा निधी; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

SCROLL FOR NEXT