Shikhar Dhawan all set for his bollywood debut Google
IPL

क्रिकेटचा 'गब्बर' सिनेमाच्या पडद्यावर; शिखर धवनचं बॉलीवूडमध्ये पदार्पण

शिखर धवन एका मोठ्या बॅनरअंतरर्गत बनणाऱ्या मोठ्या सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करीत आहे.

प्रणाली मोरे

भारतीय क्रिकेट(Indian Cricket) टीमचा सलामीचा फलंदाज शिखर धवन(Shikhar Dhawan) लवकरच अभिनयक्षेत्रात पदार्पण करीत आहे. माहितीनुसार,शिखर धवन एका मोठ्या बॅनरअंतरर्गत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करीत आहे. सध्या त्यानं क्रिकेटसाठी नाही तर अभिनय उत्तम यावा यासाठी कंबर कसली आहे. बोललं जात आहे की, शिखरने सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. पण अद्याप सिनेमांच नाव काय असेल याविषयी काही माहिती हाती लागलेली नाही.

फिल्मशी संबंधित काही सूत्रांकडून कळलं आहे की, ''शिखर पहिल्यापासूनच कलाकरांचा,अभिनय क्षेत्राचा सम्मान करीत आला आहे. जेव्हा या सिनेमातील व्यक्तीरेखेसाठी त्याला विचारणा करण्यात आली तेव्हा त्यानं लगेच काम करण्यासाठी उत्सुकता दाखवली. तो खूश झाला. निर्मात्यांना त्या व्यक्तीरेखेसाठी शिखरच योग्य वाटला होता. तोच निर्मात्यांची पहिली पसंती होता. काही महिने आधीच शिखरला या सिनेमासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. शिखरच्या भूमिकेचा ग्राफ सिनेमात बऱ्यापैकी मोठा आहे,हा कोणताही कॅमियो रोल नाही. आणि शिखरची भूमिका सिनेमातील महत्त्वाची भूमिका आहे. हा सिनेमा यावर्षातच प्रदर्शित होईल अशी आशा आहे''.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात क्रिकेट जगतात 'गब्बर' म्हणून ओळखला जाणारा शिखर अक्षय कुमारच्या आगामी 'रामसेतू' सिनेमाच्या सेटवर दिसला होता. या सिनेमात जॅकलिन फर्नांडिस,नुसरत भरूचा देखील मुख्य भूमिकेत आहेत. शिखर 'रामसेतू' च्या सेटवर दिसल्यामुळे तो सिनेमाचा भाग आहे अशी अफवा पसरली होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहे की,शिखर 'रामसेतू' सिनेमाचा भाग नसेल,त्या सिनेमातून तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत नाही. खरंतर,शिखर आणि अक्षय कुमार खूप जवळचे मित्र आहेत. आणि म्हणूनच तो 'रामसेतू' च्या सेटवर अक्षयला भेटायला गेला होता,असं कळत आहे.

अक्षय व्यतिरिक्त शिखर अभिनेता रणवीर सिंगचा देखील खूप जवळचा मित्र आहे. त्यानं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रणवीर सिंगसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की,''भावा,तुझ्यासोबतच्या आणखी एका खास भेटीचा क्षण. '83' च्या यशासाठी खूप खूप अभिनंदन. खूप छान वाटलं,मस्त सिनेमा''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT