Ben Stokes Out of IPL 2023 Playoffs : 
IPL

CSK IPL 2023 : धोनीला मोठा धक्का! CSK चा घातक ऑलराउंडर प्लेऑफ सामन्यांआधीच सीझनमधून बाहेर

IPL 2023 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या CSK ला बसला मोठा झटका

Kiran Mahanavar

Ben Stokes Out of IPL 2023 Playoffs : आयपीएल 2023 चा लीग टप्पा शेवटच्या आठवड्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा शेवटचा साखळी सामना 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सकडून होणार आहे.

प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अलीकडेच चेन्नईला KKR विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता, तेव्हापासून चेन्नईला देखील क्वालिफायर खेळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत चेन्नईला मोठा झटका बसला आहे.

CSK चा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे शेवटच्या लीग सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. म्हणजेच स्टोक्स सीएसकेच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये उपस्थित राहणार नाही. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. (Latest Marathi News)

बेन स्टोक्सने या मोसमात फक्त दोनच सामने खेळले आहेत. त्या दोन्ही सामन्यांमध्ये तो बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत फ्लॉप दिसला. तेव्हापासून तो दुखापतीमुळे बेंचवर बसला आहे.

आता मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याच्या दुखापतीबाबत वक्तव्य केले आहे. स्टोक्स अद्याप गोलंदाजी करण्यास तयार नसल्याचे त्याने म्हटले आहे. पण फलंदाजी कव्हर म्हणून तो संघाला उपयुक्त ठरू शकतो.

सीएसके संघाने गतवर्षी विसरून या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत संघाने 13 पैकी 7 सामने जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत. संघाचा एक सामना पावसाने खराब केला होता.

सध्या संघ 15 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. इथून तो प्लेऑफमध्ये जाण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. या संघाला शनिवार 20 मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. येथे संघ जिंकल्यास प्लेऑफमध्ये पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT