csk vs gt dream 11 ipl 2023 qualifier 1 chennai-super-kings-vs-gujarat-titans ms dhoni vs hardik pandya cricket news in marathi  
IPL

CSK vs GT Qualifier 1 : कोण जाणार थेट अंतिम फेरीत? चेन्नई अन् गुजरात यांच्यात पहिल्या क्वालिफायरचा सामना आज

सकाळ ऑनलाईन टीम

CSK vs GT Qualifier 1 : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्ले-ऑफ लढतींना आजपासून सुरुवात होणार आहे. चार वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्स आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आज (ता. २३) क्वालिफायर वन लढत होणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ दहाव्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सज्ज झाला असेल.

हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्सचा संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. या लढतीत पराभूत झालेल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. लखनौ सुपर जायंटस्‌ व मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत विजयी होणारा संघ क्वालिफायर वन लढतीत पराभूत झालेल्या संघाशी भिडणार आहे.

चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या आतापर्यंतच्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मॅचफिक्सिंग प्रकरणाशी संबंध आल्यामुळे चेन्नई संघावर निलंबनाशी शिक्षा सुनावण्यात आली. चेन्नई संघ २०१६ व २०१७ मध्ये सहभागी झाला नाही. या दोन वर्षांसह २०२० (सातवे स्थान) व २०२२ (नववे स्थान) या वर्षांमध्ये त्यांचा संघ अव्वल चार संघांपासून दूर होता, अन्यथा चेन्नईच्या संघाने सातत्याने अव्वल चार स्थानांपर्यंत मजल मारली आहे.

डेव्होन कॉनवे (५८५ धावा), ऋतुराज गायकवाड (५०४ धावा), शिवम दुबे (३८५ धावा), अजिंक्य रहाणे (२८२ धावा) या चार फलंदाजांवर चेन्नईची मदार आहे. मात्र आता प्ले-ऑफच्या लढतीत चेन्नईचा संघ जोखीम पत्करणार नाही. मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा या खेळाडूंकडूनही फलंदाजीत खेळ उंचावण्याची अपेक्षा असणार आहे. महेंद्रसिंह धोनी याच्याकडे कर्णधार म्हणून प्रदीर्घ अनुभव आहे. तो मास्टरमाईंड आहे. फलंदाजी विभाग अपयशी ठरल्यास पर्यायी योजनाही त्याच्याकडे तयार असेल.

  • चेन्नई अंतिम चारमध्ये पोहोचलेली वर्षे - २००८, २००९, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१५, २०१८, २०१९, २०२१, २०२३

  • गुजरातची कामगिरी - २०२२ - जेतेपद २०२३ - अंतिम चारमध्ये दाखल (प्ले-ऑफ)

चिदंमबरम स्टेडियमचा अनुभव

पहिली क्वालिफायर लढत चेन्नईतील एम. ए. चिदंमबरम स्टेडियममध्ये होणार आहे. चेन्नई संघाचे हे घरचे मैदान आहे. चेन्नईचा संघ वर्षानुवर्षे येथे खेळला आहे. यंदाच्या मोसमातील सात लढतीही त्यांनी येथे खेळल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे गुजरातचा संघ या मोसमात येथे एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे गतविजेता व यंदाच्या मोसमात साखळी फेरीत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरातसाठी आजचा पेपर सोपा नसणार आहे.

गिलचे आव्हान

चेन्नईसमोर क्वालिफायर वन लढतीत गुजरातच्या शुभमन गिल याचे आव्हान असणार आहे. सध्याचा भारतीय क्रिकेटचा प्रिन्स म्हणून नावारूपाला येत असलेल्या गिल याने १४ सामन्यांमधून २ शतके व ४ अर्धशतकांसह ६८० धावांचा पाऊस पाडला आहे. सलग दोन शतके झळकावण्याचा पराक्रमही त्याने करून दाखवला आहे. बंगळूरविरुद्धच्या साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत त्याने झुंजार शतकी खेळी करीत गुजरातला दणदणीत विजय मिळवून दिला. त्यामुळे बंगळूरचे आव्हान संपुष्टात आले. गिलला रोखण्यासाठी चेन्नईचा संघ कोणती योजना राबवतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

गोलंदाजी विभाग दमदार

गुजरातचा संघ मागील मोसमापासून आतापर्यंत सांघिक कामगिरीच्या जोरावर यश मिळवत आहे. फलंदाजांसोबत त्यांच्याकडे एकापेक्षा एक असे अव्वल दर्जाचे गोलंदाज आहेत. मोहम्मद शमी (२४ विकेट), राशीद (२४ विकेट), मोहित शर्मा (१७ विकेट), नूर अहमद (१३ विकेट) या चार गोलंदाजांना चेन्नईच्या खेळपट्टीवर आपली चुणूक दाखवावी लागणार आहे. जॉश लिटल, हार्दिक पंड्या व यश दयाल यांच्यापैकी एक खेळाडू पाचव गोलंदाज म्हणून कार्यरत असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT