CSK vs LSG Chennai mark return to Chepauk with a win beat Lucknow by 12 runs IPL 2023 Ruturaj Gaikwad MS Dhoni cricket news in marathi kgm00 
IPL

IPL 2023: ते आले.. त्यांनी पाहिले.. ते जिंकले! धोनीच्या चेन्नईने राखला 'बालेकिल्ला'

Kiran Mahanavar

चेन्नई सुपर किंग्ज 2019 नंतर त्यांच्या घरी चेपॉकमध्ये परतले, त्यांनी चाहत्यांना निराश केले नाही. चेन्नईने सोमवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 12 धावांनी पराभव केला. यासह आपले विजयाचे खाते उघडले.

चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या 57 आणि डेव्हॉन कॉनवेच्या 47 धावांच्या जोरावर 20 षटकांत 7 गडी गमावून 217 धावा केल्या. लखनौला चांगली सुरुवात करूनही हे लक्ष्य गाठता आले नाही. मोईन अलीच्या फिरकीसमोर पूर्ण 20 षटके खेळल्यानंतर लखनौला सात गडी गमावून 205 धावाच करता आल्या.

ऋतुराज गायकवाडने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यादरम्यान गायकवाडने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. ऋतुराजशिवाय डेव्हन कॉनवेने 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. गायकवाड आणि कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 9.1 षटकात 110 धावांची भागीदारी केली.

अंबाती रायडूने 14 चेंडूत 27 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. शिवम दुबेने 16 चेंडूत 27 धावा केल्या. मोईन अलीने 13 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तीन चेंडूंचा सामना केला. त्याने पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवर मार्क वुडने त्याला आयुष बडोनीकरवी झेलबाद केले. धोनीचा स्ट्राईक रेट 400 होता. बेन स्टोक्स आठ आणि रवींद्र जडेजाने तीन धावा करून बाद झाले. मिचेल सँटनर एक धाव घेत नाबाद राहिला. मार्क वुड आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. आवेश खानला ब्रेकथ्रू मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT