CSK vs PBKS Live Score  esakal
IPL

CSK vs PBKS : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाबने चेन्नई सुपर किंग्जला दिली 4 विकेट्सनी मात

Kiran Mahanavar

CSK vs PBKS Live Score IPL 2023 : पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन किंग्जमधील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेर सिकंदरने शेवटच्या चेंडूवर 3 धावा पळून काढल्या अन् पंजाबला आपला पाचवा विजय मिळवून दिला. पंजाबच्या या विजयात प्रभसिमरन सिंग (42) आणि लिम लिव्हिंगस्टोन (40 यांनी मोलाचा वाटा उचलला.

तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 200 धावा केल्या. चेन्नईकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वेने सर्वाधिक 52 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार लगावत चेन्नईला 200 धावांपर्यंत पोहचवले. ऋतुराज गायकवाडने 37 तर शिवम दुबेने 28 धावांचे योगदान दिले.

पंजाबची आक्रमक सुरूवात मात्र सीएसकेनेही दिले धक्के

चेन्नई सुपर किंग्जचे 201 धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या पंजाबने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंगने 4 षटकात पंजाबला अर्धशतक पार करून दिले. मात्र तुषार देशपांडेने शिखर धवनची 15 चेंडूत 28 धावांची केलेली खेळी संपवली.

त्यानंतर प्रभसिमरनने फटकेबाजी करत पंजाबला 8 षटकात 80 धावांपर्यंत पोहचवले. मात्र 24 चेंडूत 42 धावांची खेळी करणाऱ्या प्रभसिमरनची रविंद्र जडेजाना शिकार करत पंजाबला मोठा धक्का दिला. यानंतर जडेजाने अथर्व तायडेला 13 धावांवर बाद केले. यामुळे पंजाबची अवस्था 3 बाद 94 धावा अशी झाली.

कॉन्वेच्या धडाकेबाज 92 धावा, चेन्नई पोहचली 200 धावांवर

सलामीवीर कॉन्वेने पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात 52 चेंडूत 92 धावा चोपत संघाला 200 धावांपर्यंत पोहचवले. महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार मारत 13 धावा केल्या. यामुळेच चेन्नई 200 धावांपर्यंत पोहचू शकली.

100-1 (11.1 Ov) : चेन्नईची दमदार सुरूवात

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वे यांनी हा निर्णय सार्थ ठरवला. या दोघांनी 86 धावांची भागीदारी रचतली. मात्र ऋतुराज सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर 37 धावा करून बाद झाला. यानंतर कॉन्वेने यंदाच्या हंगामातील आपले पाचवे अर्धशतक ठोकत संघाला शतकी मजल मारून दिली. त्याच्या साथीला आलेल्या शिवम दुबेने देखील आक्रमक साथ देण्यास सुरूवात केली.

CSK vs PBKS Live: दोन्ही संघ खालीलप्रमाणे...

चेन्नई सुपर किंग्ज : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, मोईन अली, महेंद्रसिंग धोनी, तुषार देशपांडे, महिष टीक्षाना, मथिशा पाथिराना.

पंजाब किंग्ज : शिखर धवन, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, जितेश शर्मा, सॅम करण, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

CSK vs PBKS Live Score : पंजाबविरुद्ध महेंद्रसिंग धोनीने जिंकले नाणेफेक घेतला महत्त्वाचा निर्णय

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT