IPL 2022 Sakal
IPL

तू फरारी कार आहेस पण; युवा गोलंदाजाला 'स्टेनगन'कडून कानमंत्र

सकाळ डिजिटल टीम

सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा जलदगती गोलंदाज कार्तिक त्यागी संघाच्या ताफ्यात सामील झालाय. भारतीय युवा गोलंदाजाला नेटमध्ये गोलंदाजी कोच डेल स्टेन याच्याकडून धडे मिळत आहेत. 2020 अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्याकार्तिक त्यागीला ऑरेंज आर्मीनं 4 कोटी मोजून आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं होते. आता तो भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक यांच्यासोबत खेळताना दिसणार आहे.

याआधी कार्तिक त्यागीने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आपल्यातील क्षमता दाखवून दिलीये. त्याने 140 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकत आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली होती. नुकताच सनरायझर्स हैदराबादने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. नेटमधील सरावावेळी डेल स्टेन युवा खेळाडूसोबत चर्चा करताना दिसते.

गोलंदाजी कोच स्टेन 21 वर्षीय कार्तिकला सल्ला देताना म्हणतोय की, तू एक फरारी कार प्रमाणे आहेस. पण तू सहाव्या गियरमध्ये टेकऑफ करण्याऐवजी तू पहिल्या गियरचा वापर कर. हळूहळू वेग वाढव, असा सल्ला कोचन युवा भारतीय गोलंदाजाला दिलाय. SRH च्या गोलंदाजी कोचच्या रुपात स्टेनची सुरुवात फार काही चांगली झाल्याचे दिसत नाही. कारण संघाला सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागत आहे. पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजांनी 210 धावा खर्च केल्या होत्या.

संघाच्या ताफ्यात सामील झाल्यावर कार्तिक म्हणाला की, सर्वात आधी मी सर्व संघ सहकाऱ्यांची भेट घेतली. कोच डेल यांच्याशी देखील चर्चा झाली. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक होतो. पहिले सेशन खूप थकवा आणणारे होते. गोलंदाजीत यॉर्कर लेंथ चेंडू फेकण्यावर भर दिल्याचा उल्लेखही त्याने केलाय. हैदराबाद संघाची आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवातही खराब झालीये. पहिल्या दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 9 एप्रिलला संघ चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात तरी त्यांना पहिला विजय गवसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note: भारतात प्लास्टिकच्या नोटा कधी सुरू होणार? RBI गव्हर्नरांनी 'ती' वेळच सांगितली; महत्त्वाची माहिती समोर

Numerology: न सांगताही ओळखतात मनातील भावना! लहानपणापासूनच 'सीक्रेट कीपर' असतात 'या' मूलांकाचे लोक...

सर डॉन ब्रॅडमन यांनी ३ षटकांत झळकावले होते शतक... २५६ धावांच्या खेळीत १४ षटकार, २९ चौकारांची आतषबाजी...

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाकडून टेवोल्डे गेब्रेमारियम यांची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

SCROLL FOR NEXT