David Miller  
IPL

मिलरच्या ट्वीटवर राजस्थानचे उत्तर," दुश्मन ना करे दोस्त ने ..."

क्रिकेट जगतात मॅचनंतर मिलरने केलेल्या ट्विटची चर्चा रंगली आहे

Kiran Mahanavar

David Miller Sorry Tweet : आयपीएल 2022 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा गुजरात टायटन्स पहिला संघ ठरला आहे. राजस्थान रॉयल्सचा गुजरातने 7 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. गुजरातच्या खरा विजयाचा हिरो डेव्हिड मिलर त्याने राजस्थानविरुद्ध क्वालिफायर च्या पहिल्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत ६८ धावांची खेळी केली. क्रिकेट जगतात मॅचनंतर मिलरने केलेल्या ट्विटची चर्चा रंगली आहे.

डेव्हिड मिलर हा आयपीएल 2020 आणि 2021 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा भाग होता. यावेळी 2022 च्या लिलावात डेव्हिड मिलरला तीन कोटी मध्ये गुजरात टायटन्सने विकत घेतले. आयपीएलच्या या हंगामात गुजरातला अंतिम फेरीत नेल्यानंतर मिलरने आपल्या जुन्या संघाची माफी मागितली आहे. त्याने ट्विट करून राजस्थान रॉयल्सला सॉरी म्हटले आहे.

डेव्हिड मिलरचे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. राजस्थान रॉयल्सनेही डेव्हिड मिलरच्या या ट्विटला उत्तर दिले आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या शोचा एक मीम शेअर करत, ज्यामध्ये लिहिले आहे 'दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है'. सोशल मीडियावर राजस्थान रॉयल्सचे हे उत्तर चाहत्यांना खूप आवडत आहे.

डेव्हिड मिलरने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 38 चेंडूत 68 धावा केल्या त्यामध्ये त्याने 3 चौकार आणि 5 षटकार मारले. हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर यांच्यात नाबाद 106 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावा केल्या. गुजरातने 189 धावांचे लक्ष्य 19.3 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

SCROLL FOR NEXT