DC vs GT ipl 2023 gujarat-titans-beat-delhi-capitals-by-6-wickets Rishabh Pant Delhi Capital not change second consecutive defeat cricket news in marathi kgm00 
IPL

IPL 2023 : ऋषभ पंत आला तरी नाही पलटले दिल्ली कॅपिटलचे नशीब... सलग दूसरा लाजिरवाणा पराभव

IPL 2023: राजधानीत दिल्लीच्या किल्ल्याला गुजरातने लावला सुरंग!

Kiran Mahanavar

आयपीएल 2023 मध्ये चॅम्पियन गुजरात टायटन्सची विजयी घोडदौड सुरूच आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने आतापर्यंत पहिल्या 2 सामन्यात चॅम्पियन्सप्रमाणे कामगिरी केली आहे.

आयपीएलच्या सातव्या सामन्यात गुजरातने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयात गुजरातच्या अनेक खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दिल्लीच्या संघाला घरच्या मैदानावरही विजय मिळवता आला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघ सलग दुसरा सामना हरला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतही सध्या दुखापतीतून सावरत असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला. ऋषभ पंत आला तरी दिल्ली कॅपिटलचे नशीब पलटले नाही.

दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाने 18.1 षटकात 4 गडी राखून विजय मिळवला. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक नाबाद 62 धावा केल्या. डेव्हिड मिलर 31 धावांवर नाबाद परतला.

गुजरातचे सलामीवीर साहा आणि शुभमन गिल यांनी 14-14 धावा केल्या तर कर्णधार हार्दिक पंड्या 5 धावा करून बाद झाला. विजय शंकरला 29 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर मिचेल मार्शने एलबीडब्ल्यू आऊट केले. दिल्लीकडून एनरिक नोर्कियाने दोन बळी घेतले.

तत्पूर्वी, सततच्या अपयशानंतरही दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत आठ गडी गमावून 162 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 32 चेंडूत 37 तर उपकर्णधार अक्षर पटेलने 22 चेंडूत 36 धावा केल्या.

सर्फराज खान 30 आणि अभिषेक पोरेलने 20 धावा करून बाद झाले. 10 पैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. गुजरात टायटन्ससाठी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी किलर गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. अल्झारी जोसेफला दोन यश मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT