Deepak Chahar Update sakal
IPL

चेन्नईपाठोपाठ भारतीय संघाला मोठा धक्का; 2022 च्या टी20 वर्ल्डकपमधून दिपक चहर 'आऊट'

आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जनंतर आता टीम इंडियालाही धक्का

Kiran Mahanavar

IPL 2022 : आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जनंतर आता टीम इंडियालाही धक्का बसला आहे. दीपक चहर दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पण आता बातमी आली आहे की चहर 2022 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर टी-20 वर्ल्ड कप पण खेळू शकणार नाही.(Deepak Chahar Update News)

दीपक चहर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरत असताना तो पुन्हा दुखापतीचा बळी ठरला आहे. सुत्राच्या माहितीनुसार दीपक या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. पाठीच्या दुखापतीमुळे चहर किमान चार महिने क्रिकेट खेळू शकणार नाही.

चहरही पहिल्या दुखापतीतून सावरताना नेटमध्ये गोलंदाजी करत होता. त्यात पाठीच्या दुखापतीमुळे त्याला पुन्हा त्रास होईल सुरवात झाले आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

चहरची आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे त्याने आतापर्यंत खेळलेल्या 63 सामन्यांमध्ये 59 विकेट घेतल्या आहे. आतापर्यंत सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 13 धावांत 4 विकेट्स घेणे आहे. चहरची सर्वोत्तम गोलंदाजी पाहून चेन्नईने त्याला पुन्हा विकत घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT