Delhi Capitals Players 
IPL

Delhi Capitals Players : IPL मध्ये चोर सुसाट... खेळाडूंच्या बॅट्ससह महागड्या वस्तू चोरीला

Sandip Kapde

आयपीलचे सत्र जोरात सुरू आहे. प्रेक्षक देखील आयपीलमधील सामन्यांचा आनंद घेत आहेत. दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या फलंदाजांच्या बॅट, पॅड, हातमोजे आणि शूज चोरीला गेले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विदेशी खेळाडूंच्या बॅटचीही चोरी झाली असून, प्रत्येक बॅटची किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सुमारे ६ फलंदाजांच्या १६ बॅट चोरीला गेल्या आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बेंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध सामना खेळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू दिल्लीला पोहोचले. त्यांच्या किट बॅग त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तेव्हा त्यांना धक्काच बसला. कॅप्टन डेव्हिड वॉर्नरच्या ३ बॅट्स, मिचेल मार्शच्या २ बॅट्स, फिल सॉल्टच्या ३ आणि यश धुलच्या ५ बॅट्स चोरीला गेल्या आहेत. याशिवाय कोणाचे पॅड, कोणाचे हातमोजे, कोणाचे शूज आणि क्रिकेटचे इतर साहित्य देखील गायब झाले आहेत.

मात्र, दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी सरावासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी त्यांच्या एजंटशी संपर्क साधला आणि त्यांच्या बॅट कंपन्यांना पुढील सामन्यापूर्वी काही बॅट पाठवण्याची विनंती केली. मात्र विदेशी खेळाडूंना

लवकर बॅट मिळने कठीण आहे. मात्र विदेशी बॅट बनवणाऱ्या कंपन्याही भारतात आहेत, त्यामुळे त्यांना येथे बॅट मिळू शकतात, त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इंडियन एक्सप्रेस दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “प्रत्येकाच्या किट बॅगमधून वस्तू गहाळ झाल्याचे ऐकून त्यांना धक्का बसला.अशी घटना पहिल्यांदाच घडली असून लवकरच हे प्रकरण लॉजिस्टिक विभाग, पोलीस आणि नंतर विमानतळ प्राधिकरणाकडे नेण्यात आले. याप्रकरणी तपास सुरू आहे.

खेळाडू येण्यापूर्वी त्यांचे सामान त्यांच्या हॉटेलच्या खोलीबाहेर पोहोचवले जाते. याची खात्री करण्यासाठी आयपीएल संघ एका लॉजिस्टिक कंपनीला कामावर घेतात. मात्र यावेळी किट बॅगमधून बॅट चोरीला गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: 'कोलकाता कसोटीच्या चार दिवसांपूर्वी BCCI चे क्युरेटर आले आणि...', सौरव गांगुलीचा खुलासा

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : पाणी भरण्याच्या वादावरून महिलेने केली शेजाऱ्याची हत्या

SCROLL FOR NEXT