DC vs KKR IPL 2023 Live  esakal
IPL

DC vs KKR IPL 2023 : वॉर्नर - अक्षर चमकले; शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीने विजयाचा दुष्काळ संपवला

अनिरुद्ध संकपाळ

DC vs KKR IPL 2023 Live : कोलकाता नाईट रायडर्सचे 128 धावांचे माफक आव्हान पार करताना देखील दिल्लीची हवा टाईट झाली होती. केकेआरने दिल्लीचे 6 फलंदाज बाद करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. अखेर अक्षर पटेलने शेवटच्या षटकापर्यंत किल्ला लढवत दिल्लीला विजय मिळवून दिला. अक्षरने 21 चेंडूत 21 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 54 धावांची तर मनिष पांडेने 21 धावांची खेळी केली. केकेआरकडून वरूण चक्रवर्ती, अनुकूल रॉय आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत दिल्लीला घाम फोडला.

तत्पूर्वी, आयपीएलच्या 28 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरू झालेल्या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत त्यांना 20 षटकात 9 बाद 127 धावात रोखले. दिल्लीकडून इशांत शर्मा, कुलदीप यादव, नॉर्त्जे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दिल्लीकडून सलामीवीर जेसन रॉयने 39 चेंडूत 43 धावा केल्या. तर आंद्रे रसेलने शेवटच्या षटकात फटकेबाजी करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या पार करून दिली. सुरूवातीला चाचपडत खेळणाऱ्या रसेलने मुकेश कुमारच्या शेवटच्या षटकात 3 षटकार ठोकले. रसेलने 30 धावा केल्यामुळे केकेआर 127 धावांपर्यंत पोहचू शकली.

64-5 (10.2 Ov) : केकेआरचा निम्मा संघ गारद

पॉवर प्लेमध्ये 3 विकेट्स गमावलेल्या केकेआरचा डाव रॉय आणि मनदीप सिंग सावरणार असे वाटत असतानाच दिल्लीच्या अक्षर पटेलने मनदीप सिंगला 12 तर रिंकू सिंहला 6 धावांवर बाद केले. यामुळे केकेआरची अवस्था 5 बाद 64 अशी झाली.

KKR 35/3 (6) : दिल्लीचा दणका

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत केकेआरला पॉवर प्लेमध्ये तीन धक्के दिले. मुकेश कुमारने लिटन दासला 4 तर नॉर्त्जेने व्यंकटेश अय्यरला शुन्यावर बाद केले. पाठोपाठ इशांत शर्माने देखील नितीश राणाला 4 धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला. दरम्यान, सलामीवीर जेनस रॉयने एकाकी झुंज देत संघाला 35 धावांपर्यंत पोहचवले.

दिल्लीने नाणेफेक जिंकली

पावसाने उसंत घेतल्यानंतर नाणेफेक झाली. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नाणेफेकीपूर्वीच पावसाची बॅटिंग 

दिल्ली - केकेआर सामन्याच्या नाणेफेकीला पावसामुळे उशीर होत आहे. पाऊस लपंडाव खेळत असल्याने दोन्ही संघातील खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये बसून राहण्याव्यतिरिक्त गत्यंतर नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT