CSK vs SRH IPL 2023 ESAKAL
IPL

CSK vs SRH : कॉन्वे होता म्हणून... हैदराबादने 135 धावातही चेन्नईला 19 व्या षटकापर्यंत झुंजवले

अनिरुद्ध संकपाळ

CSK vs SRH IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जने सनराईजर्स हैदराबादचा 7 विकेट्स आणि 8 चेंडू राखून पराभव करत आपली गुणसंख्या 8 वर पोहचवली. मात्र सरस धावगती राखता न आल्याने त्यांना तिसऱ्या स्थानावरच रहावे लागले. हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 135 धावांचे आव्हान सीएसकेने 19 व्या षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. चेन्नईकडून डेवॉन कॉन्वेने 57 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. त्याला ऋतुराज गायकवाडने 35 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी 87 धावांची दमदार सलामी दिली.

सनराईजर्स हैदराबादचे 135 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उरतलेल्या सीएसकेने दमदार सुरूवात केली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड यांनी पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरूवात केली. कॉन्वोने आक्रमक तर ऋतुराज त्याला साथ देत होता. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली.

त्यानंतर ऋतुराज गायकवाड 35 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे देखील 10 चेंडूत 9 धावा करून माघारी फिरला. यानंतर रायडू देखील 9 धावांची भर घालून परतला. सीएसकेच्या विकेट्स पडल्यामुळे त्यांची धावगती मंदावली.सामना 15 चेंडूत 12 धावा असा आला होता. मात्र सेट झालेला डेवॉन कॉन्वे अजून क्रिजवर होता. त्याने

तत्पूर्वी, सनराईजर्स हैदराबादने 20 षटकात 7 बाद 134 धावाच करत चेन्नईसमोर विजयासाठी 135 धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने भेदक मारा करत 4 षटकात 22 धावा देत 3 बळी घेतले. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 34 धावा केल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT