Dhanshree Verma Dance With Jos Buttler and Yuzvendra Chahal Video Gone Viral esakal
IPL

Video : चहलची पत्नी धनश्रीचा बटलर सोबतचा डान्स होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2022 मध्ये फायनलपर्यंत मजल मारून चांगली कामगिरी केली. राजस्थानच्या या कामगिरीत सलामीवीर जॉस बटलर आणि युझवेंद्र चहल यांचा सिंहाचा वाटा होता. ही जोडी मैदानावर आणि मैदानाबाहेरही धमाल करताना आपण सातत्याने पाहिले आहे. आता या जोडीत युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माची देखील भर पडली आहे. सध्या सोशल मीडियावर चहल, धनश्री आणि जॉस बटलर यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

धनश्री वर्मा या व्हिडिओत जॉस बटलरला डान्स स्टेप्स शिकवताना दिसते. हा व्हिडिओ धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला. याचबरोबर बटलर आणि चहलबरोबरचे काही फोटो देखील शेअर केले. या पोस्टला धनश्रीने कॅप्शन दिले की, 'चहल आणि बटलरबद्दल माझ्या मनात जे प्रेम आणि आदर आहे तो व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. जॉस तू एक सज्जन आणि अद्भुत व्यक्ती आहेस. नक्कीच आम्ही या मजेशीर क्षण आणि काही जीवनावरच्या गंभीर चर्चांना कायम उजाळा देत राहू. जाण्यापूर्वी आपण जे एकमेकांबद्दल बोललो ते सत्य होतं. आपल्याला ट्रॉफी मिळाली नाही. मात्र आपण नक्कीच अनेकांची मने जिंकली. मी खूप आनंदी आहे की मला माझे छोटे कुटुंब तयार करण्याची संधी मिळाली. काल रात्रीचे काही चांगले क्षण शेअर करत आहे.'

जॉस बटलरने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 864 धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. या हंगामात त्याने 4 शतके देखील ठोकली. बटलर बरोबरच युझवेंद्र चहलने देखील हंगामात 26 विकेट घेत पर्पल कॅप जिंकली. विशेष म्हणजे एका फिरकीपटूने आयपीएल इतिहासात एका हंगामात 27 विकेट घेण्याची कामगिरी पहिल्यांदाच झाली आणि हा विक्रम युझवेंद्र चहलच्या नावावर नोंदवला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT