IPL 2023 Dinesh Karthik 
IPL

IPL 2023 : निवृत्तीची वेळ आली! चार दिवसांत दुसऱ्यांदा... दिनेश कार्तिकच्या कारकिर्दीवर टांगती तलवार

दिनेश कार्तिकच्या खेळावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

Kiran Mahanavar

IPL 2023 Latest News : दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) खेळावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या आधी पदार्पण करणारा डीके हा भारतीय क्रिकेटमधील अशा काही खेळाडूंपैकी एक आहे जो 19 वर्षांपासून सक्रिय क्रिकेट खेळत आहे. आयपीएलमुळे तो तीन वर्षांनी टीम इंडियात परतला.

आपल्या फिनिशिंग शैलीने निवडकर्त्यांना प्रभावित करणाऱ्या कार्तिकची गेल्या वर्षी वयाच्या 37 व्या वर्षी टी-20 विश्वचषकासाठी निवड झाली होती. पण आता 16 व्या मोसमात त्याची बॅट पूर्णपणे शांत झाली आहे. तो संघासाठी काही खास योगदान देऊ शकत नाही. काल रात्री कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचे चाहते त्याला निवृत्तीचा सल्ला देत आहेत.

दिनेश कार्तिकसमोर सर्वात मोठी अडचण असेल ती समन्वयाची. जेव्हा तो क्रीजवर असतो तेव्हा सहकारी खेळाडूंसाठी धावबाद होणे सामान्य झाले आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळताना त्याने 18 चेंडूत 22 धावा केल्या. यादरम्यान त्याने फक्त एक चौकार आणि एक षटकार मारला. 15व्या षटकात सहकारी खेळाडू सुयश प्रभुदेसाईला धावबाद करण्यात त्याचा सहभाग होता.

ही काही पहिलीच वेळ नाही, याआधी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकसोबत झालेल्या गैरसमजामुळे वानिंदू हसरंगा असाच धावबाद झाला होता. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हसरंगा स्ट्राइकवर होता. गोलंदाजाने चेंडू फेकला तेव्हा कार्तिक स्ट्राईकसाठी धावला. पण चेंडू थेट कीपरकडे गेला आणि हसरंगाला धावबाद व्हावे लागले. म्हणजे चार दिवसांत दुसऱ्यांदा आपल्या सहकारी खेळाडूला धावबाद केले आहे.

सामन्यामध्ये काय घडलं?

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. जेसी रॉयने झंझावाती अर्धशतक ठोकले. त्याचवेळी कर्णधार नितीश राणाने 21 चेंडूत 48 धावांची खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ कधीच लयीत नव्हता. विराट कोहलीने दोन चांगल्या भागीदारी रचून नक्कीच आशा उंचावल्या, पण व्यंकटेश अय्यरने त्याचा शानदार झेल टिपून आरसीबीच्या आशा संपुष्टात आणल्या. कोहलीने 54 धावा केल्या.

कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा या फिरकी जोडीने मिळून पाच बळी घेतले. रसेलने दोन विकेट्स घेऊन आरसीबीला 179/8 पर्यंत रोखले आणि कोलकाताला 21 धावांनी विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेची बिग बॉसमध्ये एंट्री

Latest Marathi News Live Update : मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील : जयंत पाटील

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

Crime: पालकांनी पोटच्या अल्पवयीन मुलीला क्रूरपणे संपवलं; नंतर रात्री अंत्यसंस्कार, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT