IPL 2024 longest six of Dinesh Karthik News sakal
IPL

Dinesh Karthik : 5 चौकार, 7 षटकार अन् DK चा राडा....! अवघ्या 2 तासात दिनेश कार्तिकने मोडला IPL 2024 मधला 'हा' रेकॉर्ड

IPL 2024 longest six of Dinesh Karthik : आयपीएल 2024 मध्ये सोमवारी एक रेकॉर्डब्रेक सामना खेळला गेला. सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील या सामन्यात धावांचा पाऊस पडला.

Kiran Mahanavar

IPL 2024 longest six of Dinesh Karthik : आयपीएल 2024 मध्ये सोमवारी एक रेकॉर्डब्रेक सामना खेळला गेला. सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील या सामन्यात धावांचा पाऊस पडला. केवळ आयपीएलमध्येच नाही तर टी-20 क्रिकेटमध्ये याआधी एका सामन्यात इतक्या धावा झाल्या नव्हत्या. 262 धावा करूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हा सामना 25 धावांनी हरला यावरून धावांच्या या वादळाचा अंदाज लावता येतो.

यासामन्यात ट्रॅव्हिस हेडच्या शानदार शतकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर हेनरिक क्लासेनही मागे राहिला नाही आणि त्याने षटकारांचा पाऊस पाडत मोसमातील सर्वात लांब षटकार ठोकला. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही आणि पुढील डावात दिनेश कार्तिकने हा विक्रम मोडीत काढला.

सामन्याच्या पहिल्या डावात क्लॉसेनने फर्ग्युसनच्या 17 व्या षटकात 106 मीटर गगनचुंबी षटकार मारला. जो या हंगामातील सर्वात लांब षटकार होता. क्लासेनपूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा निकोलस पुरन आणि कोलकाता नाईट रायडर्सचा व्यंकटेश अय्यर यांनीही 106 मीटरचा षटकार मारला होता.

मात्र, क्लासनचा हा विक्रम याच सामन्यात मोडेल, असे क्वचितच कुणाला वाटले असेल, पण तसे घडले आणि हा अप्रतिम पराक्रम बेंगळुरूच्या दिनेश कार्तिकने केला. कार्तिकने टी नटराजनच्या 16व्या षटकातील पहिल्याच क्लासनचा विक्रम मोडला. त्याने 108 मीटर लांब षटकार ठोकला. अशा प्रकारे केवळ 2 तासांत कार्तिकने क्लासेनचा विक्रम मोडला.

कार्तिकनेही अवघ्या 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कार्तिकने अवघ्या 35 चेंडूत 83 धावांची शानदार खेळी खेळली पण आरसीबीला विजयासाठी ही खेळी पुरेशी ठरली नाही आणि 262 धावा केल्यानंतर संघाचा 25 धावांनी पराभव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT