dog-entered-in-stadium-between-chennai-super-kings-and-lucknow-super-giants-ipl-2023 cricket news in marathi kgm00
dog-entered-in-stadium-between-chennai-super-kings-and-lucknow-super-giants-ipl-2023 cricket news in marathi kgm00 
IPL

IPL 2023: सामना सुरू होण्यापूर्वीच मैदानात घडली एक विचित्र घटना, खेळाडूही थक्क!

Kiran Mahanavar

Chennai Super Kings and Lucknow Super Giants : चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल 2023 चा सहावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळल्या जात आहे. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामना सुरू होण्यापूर्वीच मैदानात एक अनोखी घटना घडली, ज्याने सर्व प्रेक्षकांसोबतच खेळाडूंचेही लक्ष वेधून घेतले.

नाणेफेकीनंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले होते, मात्र त्याआधीच एक कुत्रा मैदानात घुसला. यामुळे सामना काही काळ थांबला होता. मात्र कुत्रा बाहेर गेल्याने सामना सुरू झाला. आता त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 1426 दिवसांनी सामना खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्ज तब्बल 4 वर्षांनंतर आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळण्यासाठी आला आहे. धोनीच्या संघाने या मैदानावर 2019 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.

पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईच्या नजरा मोसमातील पहिला विजय नोंदविण्यावर असतील, तर लखनौचा उत्साह मोसमातील पहिल्या विजयानंतर उंचावला आहे. लखनौचा संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग-11 : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, शिवम दुबे, मिचेल सँटनर, दीपक चहर, आरएस हंगेरगेकर.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग-11 : आयुष बडोनी, जयदेव उनाडकट, डॅनियल सायम्स, प्रेरक मांकड, अमित मिश्रा, स्वप्नील सिंग, नवीन-उल-हक, रोमॅरियो शेफर्ड, युधवीर सिंग चरक, करण शर्मा, मयंक यादव, मनन वोहरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT