Brendon Mccullum IPL 2023  esakal
IPL

Brendon Mccullum : इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्क्युलम अडचणीत, होणार मोठी कारवाई?

ब्रँडन मॅक्क्युलम भारतात ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या कंपनीशी संबंध...

सकाळ ऑनलाईन टीम

Brendon Mccullum : इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचे माजी यष्टीरक्षक फलंदाज ब्रँडन मॅक्क्युलम भारतात ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या कंपनीशी निगडीत असल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंधक नियमाच्या उल्लंघनाबाबत इंग्लंड क्रिकेट मंडळ चौकशी करत आहे. ‘२२ बेट'' ही ऑनलाईन क्रीडा बेटिंग कंपनी सायप्रस येथील नोंदणीकृत असली तरी ती भारतात प्रसिद्ध आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये त्यांचे बेटिंग कार्यरत आहे.

ब्रँडन मॅक्क्युलम कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक असल्याने इंग्लंड क्रिकेट मंडळ सावध झाले आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक नियमाचे उल्लंघन तर होत नाही ना, याची चौकशी इंग्लंड क्रिकेट मंडळाने सुरू केली आहे.

‘२२ बेट'' या कंपनीबरोबर मॅकल््म नोव्हेंबर 2022 मध्ये संबंधित झाले आणि सहा महिन्यानंतर त्यांची इंग्लंड क्रिकेट कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली, परंतु गेल्या काही आठवड्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या फेसबुक आणि युट्यूबवर केलेल्या जाहीरातींची चौकशी करण्यात येत आहे त्यामुळे ब्रँडन मॅक्क्युलम च्या अचडणी वाढू शकतात.

या संदर्भात अधिकृत निवेदन देताना इंग्लंड क्रिकेट मंडळाने म्हटले आहे की, आम्ही सध्या या प्रकरणाचा शोध घेत आहोत, तसेच मॅक्क्युलम आणि ‘22 बेट‘ कंपनीसोबतच्या संबंधांबद्दल चर्चा करत आहोत. आमच्याकडे बेटिंगचे (सट्टेबाजी) काही नियम आहेत आणि ते पाळले जात आहेत की नाही याचीही चौकशी करत आहोत.

इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक आचारसंहितेनुसार मंडळाशी करारबद्ध असलेली व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरिता इतर कोणालाही बेटिंगसाठी प्रोत्साहन देऊ शकत नाहीत, हा नियम इतर कोणत्याही सामन्यांबाबत असू शकतो.

गेल्या आठवड्यात न्यूझीलंडच्या सट्टेबाजी निवारण फौंडेशनने देशाच्या अंतर्गत घडामोडी विभागाकडे तक्रार केली होती. या कंपनीची न्यूझीलंडमधील क्रीडा सट्टेबाजीमध्ये नोंदणी नाही किंवा न्यूझीलंडमध्ये सट्टेबाजी करण्याचे प्रमाणपत्रही या कंपनीकडे नाही. त्यामुळे ही कंपनी न्यूझीलंडच्या मॅक्क्युलम यांचा चेहरा वापरू शकत नाही, असे स्पष्टीकरण न्यूझीलंडच्या सट्टेबाजी निवारण फौंडेशनने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT