Faf Du Plessis sakal
IPL

IPL 2023 : षटकांची गती न राखल्याने डुप्लेसीला १२ लाखांचा दंड

चिन्नास्वामी स्टेडियमवर अखेरच्या चेंडूपर्यंत थरारक झालेला लखनौविरुद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसीसाठी दुहेरी नुकसान करणारा ठरला.

सकाळ वृत्तसेवा

चिन्नास्वामी स्टेडियमवर अखेरच्या चेंडूपर्यंत थरारक झालेला लखनौविरुद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसीसाठी दुहेरी नुकसान करणारा ठरला.

मुंबई - चिन्नास्वामी स्टेडियमवर अखेरच्या चेंडूपर्यंत थरारक झालेला लखनौविरुद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसीसाठी दुहेरी नुकसान करणारा ठरला.

बंगळूरने हातातोंडाशी आलेला सामना तर गमावलाच; त्यामुळे तीनपैकी दोन सामन्यात पराभूत होण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्याच वेळी षटके निर्धारित वेळेत पूर्ण न केल्याबद्दल १२ लाखांचा दंडही करण्यात आला.

आयपीएलच्या नियमाप्रमाणे ९० मिनिटांच्या खेळात २० षटके पूर्ण करणे आवश्यक आहे. फाफ डुप्लेसी नेतृत्व करणाऱ्या बंगळूर संघाला ते जमले नाही. त्यामुळे आर्थिक दंडाची शिक्षा होण्याअगोदर जेवढा अधिक वेळ लागला तेवढा काळ पाचऐवजी चारच क्षेत्ररक्षक त्याला सीमारेषेवर ठेवता आले. या संधीचा फायदा लखनौच्या तळाच्या फलंदाजांनी घेतला.

आवेश खानलाही तंबी

स्वतःच्या बॅटमधून एकही धाव न काढता लखनौ संघाला अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून देणाऱ्या आवेश खानने भावनेच्या भरात हेल्मेट मैदानावर आपटले, या कृतीबद्दल सामनाधिकाऱ्यांनी त्याला तंबी दिली आहे. नियमाचे उल्लंघन केल्याचे त्याने मान्य केले. पुन्हा अशी चूक झाल्यास त्याला आर्थिक दंड होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT