fans trolled riyan parag 
IPL

रियान परागच्या 'त्या' कृतीवर चाहते हैराण; सोशल मीडियावर होत आहे ट्रोल

राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने सामन्यादरम्यान असे काही कृत्य केले, ज्यामुळे....

सकाळ ऑनलाईन टीम

Riyan Parag IPL 2022: राजस्थान रॉयल्सने (RR) आयपीएलच्या 63 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) 24 धावांनी पराभव केला. राजस्थान या विजयानंतर प्लेऑफच्या उंबरठ्यावर आला आहे. तर पराभवामुळे लखनौचा प्लेऑफचा मार्ग कठीण होत चालला आहे. राजस्थानने 20 षटकांत 6 गडी गमावून 178 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 154 धावाच करू शकला. राजस्थान 13 सामन्यांत 8व्या विजयानंतर 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने सामन्यादरम्यान असे काही कृत्य केले, ज्यामुळे तो आता सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.(Fans Trolled Riyan Parag)

रियान परागनेप्रसिद्ध कृष्णाच्या 20व्या षटकात लाँग-ऑनवर मार्कस स्टॉइनिसचा झेल पकडला. स्टॉइनिसचा झेल घेताचा राजस्थानने आपले दोन गुण निश्चित केले. मात्र झेल पकडल्यानंतर परागने ज्याप्रकारे सेलिब्रेशन केले. त्यावरून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परागने झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीच्या अगदी जवळ नेला आणि त्याला चेंडूला जमिनीला स्पर्श करायचा असे दाखवले. जरी तो हे विनोद करत होता. पण त्याच्या या कृतीमुळे पराग आता चाहत्यांच्या निशाण्यावर आला आणि सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियावरील चाहत्यांचे परागशी वेगळेच नात आहे. पण यावेळी मॅथ्यू हेडन आणि इयान बिशप हे 20 वर्षीय क्षेत्ररक्षकाच्या सेलिब्रेशनवर नाराज दिसले. इतर चाहत्यांनी या कृत्याबद्दल परागची तीव्र निंदा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT