RCB | IPL Sakal
IPL

IPL 2024: तब्बल 47 कोटींच्या खेळाडूंना RCB ने बेंचवर बसवलं... माजी भारतीय क्रिकेटरची पोस्ट चर्चेत

Royal Challengers Bengaluru: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आयपीएलच्या 17व्या हंगामात संघर्ष करावा लागत आहे, त्यातच सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात स्टार खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नव्हती, यावरून आता त्यांच्यावर टीकाही होत आहे.

Pranali Kodre

Royal Challengers Bengaluru News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला सनरायझर्स विरुद्ध 25 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा बेंगळुरू संघाचा आयपीएलच्या 17 व्या हंगामातील एकूण सहावा तर सलग पाचवा पराभव ठरला.

बेंगळुरूचा संघ यंदाच्या हंगामात सातत्याने संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे बेंगळुरूने अनेक खेळाडूंनाही यंदा संधी देऊन पाहिली आहे, परंतु, त्यांच्यासाठी निकाल बदललेला नाही. तसेच बेंगळुरूला गोलंदाजांच्या सुमार कामगिरीचाही फटका बसला आहे.

यातच बेंगळुरूने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अनेक मोठ्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नव्हती, यावर भारताचा क्रिकेटपटू अभिनव मुकुंदने प्रकाश टाकला आहे. त्याने याकडे लक्ष वेधले की बेंगळुरूने जवळपास 47 कोटी खर्च केलेले चार खेळाडू या सामन्यात खेळवले नव्हते.

बेंगळुरूने कॅमेरॉन ग्रीनला 17.5 कोटी रुपयांत मुंबई इंडियन्सकडून ट्रेड करत घेतले होते, तसेच अल्झारी जोसेफला लिलावात बेंगळुरूने 11.5 कोटी रुपये मोजत संघात घेतले.

याशिवाय 11 कोटी आणि 7 कोटी अशी किंमत असलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांनाही या सामन्यात बेंगळुरूने खेळवले नाही. या सर्वांची मिळून किंमत 47 कोटी होते. याबाबत अभिनव मुकुंदने पोस्ट केली आहे.

बेंगळुरू संघाला धक्का

दरम्यान, बेंगळुरूला हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मॅक्सवेलने आयपीएलच्या 17 व्या हंगामातून ब्रेक घेतला आहे, त्याने मानसिक आणि शारिरीक थकव्याचे कारण देत ब्रेक घेतला आहे.

हैदराबादविरुद्ध पराभव

बेंगळुरूचा हैदराबादविरुद्धचा सामना ऐतिहासिक ठरला, कारण या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 549 धावा काढल्या. कोणत्याही टी20 सामन्यात निघालेल्या या सर्वाधिक धावा आहेत. तसेच या सामन्यात एकूण 81 बाऊंड्री मारण्यात आल्या.

या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 287 धावा केल्या होत्या. या आयपीएलमध्ये एखाद्या संघाने उभारलेल्या सर्वोच्च धावा आहेत. त्यानंतर बेंगळुरूने 20 षटकात 7 बाद 262 धावा केल्या. पण त्यांना विजयासाठी 26 धावा कमी पडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT