Gautam Gambhir argument with fourth umpire Sakal
IPL

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

KKR vs PBKS: शुक्रवारी आयपीएलमध्ये झालेल्या पंजाब किंग्सविरुद्धच्य सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीर एका धाव नाकारल्याने अंपायरवर भडकलेला दिसला होता.

Pranali Kodre

Gautam Gambhir Viral Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धेत शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने 8 विकेट्सन ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

या सामन्यात कोलकाताने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग पंजाबने 19 व्या षटकातच पूर्ण केला. पंजाबच्या या विजयामुळे कोलकाताचा मार्गदर्शक गौतम गंभीर निराश दिसला होता. दरम्यान, पंजाबने विजय मिळवण्यापूर्वी या सामन्याच्या पहिल्याच डावात गंभीर पंचांवर भडकलेलाही दिसला.

झाले असे की प्रथम फलंदाजी करत असलेल्या कोलकाताकडून आंद्रे रसेल आणि वेंकटेश अय्यर फलंदाजी करत असताना 14 व्या षटकात पंजाबकडून राहुल चाहर गोलंदाजी करत होता.

यावेळी त्याने या षटकातील टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर रसेलने कट शॉट खेळत कव्हरच्या दिशेने चेंडू मारला. पण आशुतोष शर्माने चपळाईने चेंडू पकडला आणि तो यष्टीरक्षक जितेश शर्माकडे फेकला. पण त्याच्या बाजूने चेंडू गेल्याने तो पुन्हा पकडण्यापर्यंत रसेल आणि वेंकटेशने एक चोरटी धाव धावली.

परंतु, त्यांना ही धाव नाकारण्यात आली, कारण मैदानावरील पंत अनिल चौधरी यांनी आधीच आशुतोषने चेंडू पकडल्यानंतर हा चेंडू आणि षटक पूर्ण झाल्याचा इशारा केला होता. नियमानुसार जेव्हा पंच चेंडू पूर्ण झाल्याचा इशारा करतात, त्यानंतर केलेल्या धावा ग्राह्य धरल्या जात नाही.

मात्र, यावरून कोलकाताच्या डगआऊटमध्ये बसलेला गंभीर चांगलाच तापला. त्याने फोर्थ अंपायरकडे याबद्दल रागात नाराजी व्यक्त केली. याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, गंभीर जरी या घटनेवर चिडला असला, तरी खेळपट्टीवर असलेल्या रसेलने कोणतीही प्रतिक्रिया यावर दिली नव्हती.

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 261 धावा केल्या होत्या. कोलकाताकडून फिल सॉल्टने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली, तर सुनील नारायणने 71 धावांची खेळी केली. त्यामुळे कोलकाताने 20 षटकात 6 बाद 261 धावा केल्या होत्या. पंजाबकडून आर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 262 धावांच्या आव्हानाचा पाठलाग पंजाबने 18.4 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केला. पंजाबकडून जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 108 धावांची नाबाद खेळी केली, तर शशांक सिंगने नाबाद 68 धावा केल्या आणि प्रभसिमरन सिंगने 54 धावा केल्या. कोलकाताकडून एकमेव विकेट सुनील नारायणने घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT