Gautam Gambhir - MS Dhoni | IPL Sakal
IPL

Gautam Gambhir: प्रोसेस महत्त्वाची की रिझल्ट? गंभीरच्या नव्या स्टेटमेंटमुळे माहीचे चाहते खवळले, काय आहे नवा वाद

Gautam Gambhir: गौतम गंभीरने नुकतेच एक स्टेटमेंट केलं आहे, जे धोनीच्या चाहत्यांना मात्र दुखावणारे आहे.

Pranali Kodre

Gautam Gambhir Statement: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने यंदा चांगली कामगिरी केली आहे. कोलकाता संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे कोलकाता संघात गौतम गंभीरची यंदाच्या हंगामातून घरवापसी झाली आहे.

कोलकाताचा माजी कर्णधार गंभीर यंदा संघाच्या मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने पहिल्या 6 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत. या दरम्यान गंभीरने नुकतेच म्हटले आहे की त्याच्यासाठी निकाल महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.

नाईट्स डगआऊट पॉडकास्टमध्ये गंभीरने स्पष्ट सांगितले की त्याचा प्रक्रियेपेक्षा निकाल जास्त महत्त्वाचा आहे.

गंभीर म्हणाला, 'मी हे खूप खुलेपणाने सांगतो की माझ्यासाठी निकाल महत्त्वाचा आहे. प्रक्रिया या शब्दावर आणि योग्य प्रक्रिया करत राहा, निकाल आपोआप मिळेल, या वाक्यावर अजिबात विश्वास नाही. माझ्यासाठी निकाल महत्त्वाचा आहे. कारण लोक कोलकाता नाईट रायडर्सला जिंकताना पाहायला आलेले असतात.'

धोनीच्या चाहत्यांच्या लागलं जिव्हारी

दरम्यान, गंभीरने त्याचे मत मांडले असले, तरी त्याचे हे मत धोनीच्या चाहत्यांना दुखावणारे आहे. कारण धोनीने अनेकदा मुलाखतींमध्ये असे सांगितले आहे की त्याच्यासाठी प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे, जर प्रक्रियेची काळजी घेतली, तर निकाल आपोआप मिळतो.

आता धोनीच्या या विचारांच्या अगदी उलट मत गंभीरने मांडले असल्याने धोनीच्या चाहत्यांना ते पटलेलं नाही.

गंभीरने केले कोलकाताच्या चाहत्यांचे कौतुक

गंभीरने पॉडकास्टमध्ये बोलताना कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या चाहत्यांचेही कौतुक केले असून त्याने म्हटले आहे की ते सर्वात प्रामाणिक चाहते आहेत. त्याने म्हटले आहे की संघाच्या संघर्षाच्या काळातही ते नेहमीच संघाच्या बाजूने उभे राहिले आहेत.

गंभीरने अनेक वर्षे कोलकाता नाईट रायडर्सने नेतृत्व केले असून त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाताने 2012 आणि 2014 साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT