IPL

MI vs RCB : मॅक्सेवेल - ड्युप्लेसिसच्या वादळाचा मुंबईला बसला तडाखा; कराव्या लागणार 10 च्या सरासरीने धावा

अनिरुद्ध संकपाळ

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर बेंगलोरने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान उभे केले. मुंबईच्या बेहरनडॉर्फच्या भेदक माऱ्यासमोरही ग्रेन मॅक्सवेल (66) आणि फाफ ड्युप्लेसिस (65) यांनी झंजावाती 120 धावांची भागीदारी रचली. दिनेश कार्तिकने स्लॉग ओव्हरमध्ये 17 चेंडूत 30 धावा करत आरसीबीला 200 धावांच्या जवळ पोहचवले. मुंबईकडून जेसन बेहरनडॉर्फने चांगला मारा करत 36 धावात 3 बळी टिपले.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. पॉवर प्लेमध्ये आरसीबीची सुरूवात खराब झाली. डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फने पहिल्याच षटकात विराट कोहलीला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात अर्जुन रावतला 6 धावांवर बाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला.

आरसीबीच्या 16 धावा झाल्या असताना विराट कोहली आणि अर्जुन रावत दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी आरसीबीचा डाव सारवला. ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक फलंदाजी करत 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. तर फाफ ड्युप्लेसिसने देखील आपला गिअर बदलला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत आरसीबीला 10 व्या षटकात 104 धावांपर्यंत पोहचवले.

आरसीबीची मॅक्सवेल आणि ड्युप्लेसिस जोडी कधी शतकी भागीदारीपर्यत पोहचली हे कळालेच नाही. 120 धावांची भागीदारी रचत संघाला 13 व्या षटकातच 136 धावांपर्यंत पोहचवले होते. अखेर बेहरनडॉर्फने 33 चेंडूत 68 धावा करणाऱ्या मॅक्सवेलला बाद केले अन् ही जोडी फोडली.

मॅक्सवेल बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोर 1 तर फाफ ड्युप्लेसिस देखील 41 चेंडूत 65 धावांची खेळी करून बाद झाला. यामुळे आरसीबीचे अवस्था 2 बाद 136 धावांवरून 5 बाद 146 धावा अशी झाली. मुंबईने 13 व्या षटकानंतर सामन्यात जोरदार पुनरागमन केले. आता शेवटच्या 5 षटकात दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांच्यावर आरसीबीला मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी होती.

त्यातच कॅमरून ग्रीनने दिनेश कार्तिकचा साधा झेल सोडला. दिनेश कार्तिकने या संधीचा फायदा उचलत स्लॉग ओव्हरमध्ये फटेकबाजी करण्यास सुरूवात केली. त्याने 18 व्या षटकातच आरसीबीला 185 धावांपर्यंत पोहचवले. मात्र 18 चेंडूत 30 धावा करणारा कार्तिक अखेर 19 व्या षटकात वधेराच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर केदार जाधव आणि वानिंदू हसरंगाने कसेबसे आरसीबीला 20 षटकात 199 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT