Glenn Maxwell Married Indian origin girlfriend Vini Raman  ESAKAL
IPL

ग्लेन मॅक्सवेलचे दोन वर्षापासून तटलले लग्न अखेर झाले संपन्न

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) भारतीय वंशीची मैत्रिण विनी रमन (Vini Raman) हिच्याशी शुक्रवारी लग्नगाठ (Marriage) बांधली. हे दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. विनी आणि मॅक्सवेल यांनी 14 मार्च 2020 ला साखरपुडा केला होता. मात्र कोरोनामुळे त्यांचे लग्न लांबले होते. अखेर त्यांनी आयपीएलपूर्वी लग्नगाठ बांधली.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) आपला धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आरसीबीने 'ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन हे आपल्या आयुष्यातील एक नव्या अध्यायाला सुरूवात करत आहे. आरसीबी कुटुंब अत्यंत आनंदी आहे. दोघांनाही आनंदी आणि शांतीपूर्ण आयुष्य लाभो ही सदिच्छा' अशी पोस्ट लिहिली.

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन यांनी आपल्या लग्नाबाबतची अधिकची माहिती अजून दिलेली नाही. आयपीएलचा 15 वा हंगाम, ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पाकिस्तान दौरा यामध्ये ग्लेन मॅक्सवेलने आपल्या दीर्घ काळापासून थांबलेल्या लग्नाचा बार उडवून दिला. लग्नामुळे मॅक्सवेल पाकिस्तान दौऱ्यावरील वनडे मालिका आणि आयपीएलचे काही सामने मुकरणार आहे.

काही दिवसांपूर्वी मॅक्सवेलच्या भारतीय पद्धतीने होणाऱ्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती. ही पत्रिका विनीच्या नातलगांनी सोशल मीडियावर टाकली होती. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेलने यावर नाराजी देखील व्यक्त केली होती. यानंतर मॅक्सवेल आणि विनीच्या लग्नाबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. अखेर विनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लग्न झाल्याची अधिकृत घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT