Glenn Maxwell Tamil Marriage Video esakal
IPL

लग्नात मॅक्सी-विनी वरमाळ घेऊन नाचले; Video होतोय व्हायरल...

सकाळ डिजिटल टीम

ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) भरतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनबरोबर (Vini Raman) 18 मार्चला ख्रिस्ती पद्धतीने लग्न (Marriage) केले होते. याबाबतची पोस्ट आणि फोटो या दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केली होती. आता या दोघांच्या लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून त्यांनी तामिळ पद्धतीनेही लग्न (Tamil Marriage) केल्याचे उघड झाले आहे.

या व्हिडिओत मॅक्सवेलने भारतीय वर जसा पोषाख करतो तसा पोषाख केला आहे. मॅक्सवेलने शेरवनी घातलेली दिसते. तो आपल्या हातात वरमाळ घेऊन डान्स करत होता. मॅक्सवेल बरोबरच विनी देखील त्याच्या सोबत डान्स करताना दिसत आहे.

मॅक्सवेल आणि विनीच्या भारतीय पद्धतीने झालेल्या लग्नाचा फोटो सीएसकेने देखील शेअर केला आहे. चेन्नई सुपर किंग्जने आपल्या ट्विटवर दोघांचा एक स्पेशल फोटो शेअर करत 'मॅक्सवेल आता चेन्नईचा जावई बनला, लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या नव्या पार्टनरशिपमध्ये खूप साऱ्या शिट्ट्या वाजोत.' असे कॅप्शन देखील दिले.

मॅक्सवेल आणि विनी एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत होते. दोघांनी 18 मार्चला लग्नाचा बार उडवून दिला. या लग्नासाठी मॅक्सवेलने पाकिस्तान दौऱ्यावर देखील पाणी सोडले होते. याचबरोबर तो आयपीएल 2022 च्या हंगामातील सुरूवातीचे काही सामने देखील मुकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मोठा निकाल! गरोदरपणात सुनेला नोकरी सोडण्याचा सल्ला देणे ही क्रूरता नाही; मुंबई न्यायालयाचा निर्णय

मृत्यू समोर उभा…पण टीसी देवदूत ठरला; प्रवाशाचा 3 सेकंदात जीव वाचला, रेल्वे स्थानकावर थरारक प्रसंग, पाहा Video

Amravati Crime : डोक्यावर गोळी झाडून क्यूआरटी जवानाची आत्महत्या; पोलिस आयुक्तालयाच्या बेसमेंटमधील घटनेमुळे खळबळ

Mumbai News : गुटखा-हुक्का प्रकरणात विभागाची वादग्रस्त भूमिका; जप्त माल सोडण्यास परवानगी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह

Nagpur News : महिलेच्या पोटातून काढला १३ किलो वजनाचा फुटबॉलच्या आकाराचा ट्यूमर

SCROLL FOR NEXT