IPL

IPL 2024 : रोहितला कर्णधार पदावरून काढल्यानंतर मुंबईची आज गुजरातशी सलामी! पांड्या कोणाला देणार संधी?

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणारा आयपीएल सामन्यात हार्दिक पंड्या केंद्रबिंदू असणार आहे. दोन वर्षे ज्या संघाची सेवा केली, त्याच संघाविरुद्ध तो कर्णधार म्हणून लढणार आहे, त्यातच त्याची तंदुरुस्तीही पणास लागणार आहे.

Kiran Mahanavar

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणारा आयपीएल सामन्यात हार्दिक पंड्या केंद्रबिंदू असणार आहे. दोन वर्षे ज्या संघाची सेवा केली, त्याच संघाविरुद्ध तो कर्णधार म्हणून लढणार आहे, त्यातच त्याची तंदुरुस्तीही पणास लागणार आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ नेहमीच हॉट फेव्हरिट राहिलेला आहे. यंदाच्या स्पर्धेतही मुंबईकडे ताकदवार संघ म्हणून पाहिले जात आहे. पाच विजेतेपद मिळवून देणाऱ्या या संघाचा कर्णधार रोहित शर्माला नेतृत्वपदावरून दूर करून ‘आयात’ करण्यात आलेल्या; परंतु पूर्वाश्रमीच्या हार्दिक पांड्याकडे थेट कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिकवरची जबाबदारी वाढली आहे.

हाच हार्दिक पंड्या १९ ऑक्टोबरनंतर स्पर्धात्मक सामन्यात खेळणार आहे. त्याची तंदुरुस्ती नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता कर्णधार या नात्याने त्याच्यावर सर्व १४ साखळी सामने खेळण्याची जबाबदारी असेल. या आयपीएलनंतर लगेचच ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. त्यासाठीही हार्दिकची तंदुरुस्ती पणास लागणार आहे.

गेली अनेक वर्षे मुंबई संघाच्या नेतृत्वाची धुरा वाहणारा रोहित शर्मा प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होत केवळ फलंदाज म्हणून खेळणार आहे. जबाबदारी कितीही असली तरी त्याची बेधडक फलंदाजी कधी थांबत नाही तरीही उद्या त्याची बॅट किती आक्रमक होती याकडे सर्वांचे लक्ष असेल.

शुभमन गिलचीही परीक्षा

हार्दिक पांड्या मुंबई संघात गेल्यामुळे गुजरातच्या रिकाम्या झालेल्या कर्णधारपदी शुभमन गिलची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे आयपीएलमध्ये तो कसे नेतृत्व करतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

इशान किशनवर लक्ष

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांत खेळण्याचे आदेश धुडकावणारा इशान किशन बीसीसीआयच्या मर्जीतून उतरला आहे. आता त्याला केवळ आयपीएलचा आसरा आहे. त्यामुळे आयपीएलमधील अस्तित्व टिकवायचे असेल तर त्याला आपले नाणे खणखणीत वाजवावे लागणार आहे.

मुंबईकडे स्वतः हार्दिकसह मोहम्मद नबी आणि रोमारिओ शेफर्ड असे आणखी दोन अष्टपैलू आहेत; परंतु चारच परदेशी खेळाडू खेळवू शकत असल्यामुळे कोणाला स्थान मिळते हे महत्त्वाचे आहे.

गतवर्षी मुंबई संघ प्रामुख्याने वेगवान गोलंदाजीत कमकुवत ठरला होता, यावेळी जसप्रीत बुमरा परतल्यामुळे ताकद अधिकच वाढली आहे. त्याच्या साथीला कोएत्झी, हार्दिक पांड्या आणि आकाश मधवाल असे गोलंदाज आहेत.

मुंबई : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेव्हाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमरा, पियुष चावला, गेलार्ड कोएत्झी, टीम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अनशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना एमफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोणारिओ शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विश्नू विनोद, नेहल वाधेरा, लुक वूड.

गुजरात : शुभमन गिल (कर्णधार), अझमतुल्ला ओमरझाई, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जॉश लिटल, अभिवन मनोहर, डेव्हिड मिलर, सुशांत मिश्रा, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रशीद खान, वृद्धिमन साहा, साई किशोर, साई सुदर्शन, एम. शहारुख खान, विजय शंकर, बीआर शरथ, मोहित शर्मा, मानव सुतार, राहुल तेवटिया, मॅथ्यू वेड, केन विल्यम्सन, जयंत यादव आणि उमेश यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT