IPL

Gujrat Titans चं माहीसाठी भावनिक ट्विट; 'आमच्यात दडलेलं ते लहान मुल तुला चषक...'

हेच खरं स्पोर्ट्समनशिप स्पिरीट असं म्हणत नेटकऱ्यांनीही गुजरातच्या संघाचं कौतुक केलं

धनश्री ओतारी

चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नावं कोरलं. गतविजेत्या संघाला चेन्नईने पराभूत केले असले तरी गुजरातने चेन्नईच्या विजयाच्या आनंदातच आपला आनंद मानला आहे. सामना गमावणाऱ्या गुजरातने माहीसाठी भावनिक ट्विट केले आहे. जे सध्या तुफान व्हायरल होतं आहे.

''वल्ला थाला! आम्हाला ठाऊक होतं की या सामन्यात आम्हाला फक्त तुझ्या बुद्धीचातुर्याशीच नव्हे, तर चेन्नईच्या चाहत्यांचाही सामना करावा लागणार होता. आज आमचा हिरमोड झाला खरा, पण आमच्यात दडलेलं ते लहान मुल तुला चषक उचलताना पाहून आताही प्रचंड आनंदात आहे'', असं ट्विट गुजरातच्या संघाकडून करण्यात आलं. '' अशा आशयाचे ट्विट करत गुजरातने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्विटसोबत गुजरातच्या संघानं माहीचा एक फोटोही शेअर केला आहे. संघातील खेळाडूंमध्ये असणारं एक अव्यक्त नातं पाहून हेच खरं स्पोर्ट्समनशिप स्पिरीट असं म्हणत नेटकऱ्यांनीही गुजरातच्या संघाचं कौतुक केलं.

एका मुलाखतीदरम्यान, धोनी माझा लाईफ कोच आहे. माही आणि माझं नातं एकदम घट्ट आहे. माही भाई डार्लिंग सारखा आहे. मी त्याच्याबरोबर अनेक गोष्टी करू शकतो जे इतर कोणी करू शकत नाही. अशी भावना पांड्याने व्यक्त केली होती.

संघाला शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज होती. त्याचवेळी षटकाच्या पाचव्या चेंडूमध्ये रवींद्र जडेजानं षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत त्यानं मैदानात विजयोत्सव सुरु केला. जडेजानं या सामन्यात 6 चेंडूंवर 15 धावा करत तो नाबाद राहिला आणि चेन्नईच्या नावे पाचव्यांचा आयपीएलच्या विजेतेपदाची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT