Kane Williamson Ruled Out IPL 2023
Kane Williamson Ruled Out IPL 2023 
IPL

IPL 2023 : पहिल्या विजयासह गुजरातला मोठा धक्का! दिग्गज कर्णधार बाहेर?

Kiran Mahanavar

Kane Williamson Ruled Out IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात करणाऱ्या गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या विजयानंतरच हार्दिक पांड्याचे टेन्शन वाढले आहे.

गुजरातचा स्टार खेळाडू आणि न्यूझीलंडचा दिग्गज कर्णधार केन विल्यमसन संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्याची बातमी आली आहे. विल्यमसन लीगच्या सुरुवातीच्या सामन्याचा भाग होता, पण क्षेत्ररक्षण करताना तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले.

पहिल्या विजयानंतरच गुजरातला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 13व्या षटकात हवेत शॉट मारल्याने विल्यमसनला दुखापत झाली होती. विल्यमसन सीमारेषेजवळ त्याचा झेल घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याने उडी मारली पण झेल घेऊ शकला नाही आणि स्वत:ला दुखापत झाली.

सीमारेषेवरच विल्यमसन वेदनेने ओरडू लागला. त्याला नीट उभेही राहता येत नव्हते. 2 खेळाडूंनी त्याला उचलून मैदानाबाहेर काढले. विल्यमसनच्या जागी साई सुदर्शन मैदानात आला आणि त्यानेही फलंदाजी करत 22 धावांचे योगदान दिले. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गुजरातचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन म्हणाले की, विल्यमसनची दुखापत योग्य वाटत नाही.

कर्स्टनला आशा आहे की सर्व काही ठीक आहे. विल्यमसनच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन त्यांच्या टेन्शन वाढले आहे. विल्यमसनला सावरायला वेळ लागेल असे कर्स्टनला वाटते. एकदिवसीय विश्वचषकही खेळला जाणार आहे आणि त्यामुळे विल्यमसनच्या दुखापतीमुळे गॅरी कर्स्टनलाही चिंता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT