CSK vs GT Qualifier 1
CSK vs GT Qualifier 1  esakal
IPL

CSK vs GT Qualifier 1 Live : चेन्नईने गाठली फायलन, गुजरातचा केला 15 धावांनी पराभव

अनिरुद्ध संकपाळ

CSK vs GT Qualifier 1 : चेन्नई सुपर किंग्जने ठेवलेल्या 173 धावांचे आव्हान पार करताना गुजरातला 20 षटकात सर्वबाद 157 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईने 15 धावांनी सामना जिंकत फायनल गाठली. गुजरातकडून शुभमन गिल (42) आणि राशिद खानने (30) झुंजार खेळी केली. मात्र धोनीची कॅप्टन्सी अन् चेन्नईच्या पोरांची दमदार गोलंदाजी याच्या जोरावर चेन्नईने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची फायनल गाठली. चेन्नईकडून दीपक चाहर, रविंद्र जडेजा आणि महीश तिक्षाणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

चेन्नईनेही मुसक्या आवळल्या 

चेन्नई सुपर किंग्जने ठेवलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सची सुरूवात खराब झाली. वृद्धीमान साहा 12 धावांवर तर कर्णधार हार्दिक पांड्या 8 धावांची भर घालून माघारी परतला. गुजरातची अवस्था 6 षटकात 2 बाद 45 अशी झाली. दरम्यान, सलामीवीर शुभमन गिलने गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने गुजरातला 10 षटकात 72 धावांपर्यंत पोहचवले. मात्र दुसऱ्या बाजूने 16 चेंडूत 17 धावा करणाऱ्या दसुन शानकाला रविंद्र जडेजाने बाद करत गुजरातला तिसरा धक्का दिला.

चेन्नईचा डाव ढेपाळला.

ऋतुराज बाद झाल्यानंतर कॉन्वेने चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मोठे फटके मारण्यात अपयश येत होते. दरम्यान, शिवम दुबे 1 तर अजिंक्य रहाणे 17 धावा करू माघारी गेले. डेवॉन कॉन्वे देखील 34 चेंडूत 40 धावा करून बाद झाला.

यानंतर आलेल्या अंबाती रायडूने 9 चेंडूत 17 धावा चोपल्या खऱ्या मात्र त्याला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. दरम्यान, चेन्नईने आपली दीडशतकी मजल मारली होती. मात्र शेवटची दोनच षटके राहिली असताना धोनी 1 धाव करून बाद झाला. अखेर रविंद्र जडेजाने 22 धावांचे आणि मोईन अलीने 9 धावांचे योगदान देत चेन्नईला 172 धावांपर्यंत पोहचवले.

ऋतुराजचे अर्धशतक 

ऋतुराज गायकवाडने पॉवर प्लेनंतर धावांची गती वाढवत सीएसकेला 10 षटकात 85 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, 37 चेंडूत ऋतुराजने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र 44 चेंडूत 60 धावा केल्यानंतर ऋतुराजला मोहित शर्माने बाद करत चेन्नईला 87 धावांवर पहिला धक्का दिला.

CSK 31/0 (4) : ऋतुराजने जीवनदानाचा उचलला फायदा

चेन्नई सुपर किंग्जला दर्शन नळकांडेने पहिला धक्का दिला होता. त्याने ऋतुराज गायकवाडला 2 धावांवर बाद केले होते. मात्र तो चेंडू अंपायरने नो बॉल दिला अन् ऋतुराजला जीवनदान मिळाले. त्यानंतर ऋतुराजने पुढच्याच चेंडूवर षटकार मारला. मात्र गुजरातच्या वेगवान गोलंदाजांनी विशेष करून दर्शन नळकांडेने सीएसकेच्या सलामीवीरांना हात खोलण्याची फारशी संधी दिली नाही. चेन्नईने 4 षटकात 31 धावांपर्यंत मजल मारली.

मात्र यानंतर ऋतुराज गायकवाडने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्याने सीएसकेला 7 व्या षटकात 60 धावांचा टप्पा पार करून दिला होता. दुसऱ्या बाजूने डेवॉन कॉन्वे त्याला सावध फलंदाजी करत साथ देत होता.

गुजरातने नाणेफेक जिंकली. 

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने आपल्या संघात एक बदल केला असून यश दयालच्या जागी दर्शन नळकांडेला संधी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT