Gujarat Titans vs Delhi Capitals  ESAKAL
IPL

GT vs DC : इशांत शर्माची दमदार गोलंदाजी, गुजरातला 130 धावांचे आव्हानही झेपले नाही

अनिरुद्ध संकपाळ

Gujarat Titans vs Delhi Capitals : यंदाच्या आयपीएलमध्ये जे आता संपल्यात जमा होते असे अनेक खेळाडू चमकले. आज नंबर होता तो इशांत शर्माचा! त्याने शेवटच्या षटकात फक्त 12 धावा वाचवायच्या असताना, समोर हार्दिक आणि राहुल तेवतिया अशातना भन्नाट गोलंदाजी करत फक्त 6 धावा देत एक विकेट घेत दिल्लीचा विजय साकार करून दाखवला. दिल्ली कॅपिटल्सने गुजरातचा 5 धावांनी पराभव करत आपला तिसरा विजय मिळवला. गुजरातकडून हार्दिक पांड्याने नाबाद 59 धावा केल्या तर राहुल तेवतियाने 7 चेंडूत 20 धावा चोपून दिल्लीचे टेन्शन वाढवले होते.

तत्पूर्वी, पॉईंट टेबलमध्ये अव्वल असणाऱ्या गुजरात टायटन्सविरूद्ध दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना 20 षटकात 8 बाद 130 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून मोहम्मद शमीने 4 षटकात 11 धावा देत 4 बळी टिपले. अखेर अमन हकीम खानने 51 धावांची अर्धशतकी तर अक्षर पटेलने 27 धावांची खेळी करत दिल्लीची लाज वाचवली. दिल्लीकडून मोहित शर्माने देखील 2 बळी टिपले.

हार्दिकचे अर्धशतक, तेवतियाचा आक्रमक अवतार 

मात्र यानंतर हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी पाचव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी रचली. गुजरात शंभरीच्या जवळ पोहचला असतानाच खलीलने अभिनव मनोहरने 26 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान, एक बाजू लावून धरलेल्या हार्दिक पांड्याने अर्धशतक ठोकले होते.

त्याच्या जोडीला आता राहुल तेवतिया आला होता. मात्र गुजरातला 12 चेंडूत 33 धावांची गरज होती. सामना तसा अवघड होता. मात्र आईस मॅन राहुल तेवतियाने 19 वे षटक टाकणाऱ्या नॉर्त्जेच्या शेवटच्या तीन षटकात तीन षटकार ठोकले. या षटकात तब्बल 21 धावा झाल्या. आता सामना 6 चेंडू आणि 12 धावा असा आली होता.

अनुभवी इशांत शर्माने शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने पहिल्या चेंडूवर 2 दुसऱ्या चेंडूवर 1 धाव दिली. तिसरा चेंडू निर्धाव टाकला. तर चौथ्या चेंडूवर राहुल तेवतियाला बाद केले. आता सामना 2 चेंडूत 9 धावा असा आला. मात्र इशांतने पाचव्या चेंडूवर 2 धावा दिल्या. आता 1 चेंडू आणि 7 धावा असे इक्वेशन आले होते. राशिद खान स्ट्राईकवर होता. मात्र राशिदला फक्त दोन धावा करता आल्या आणि इशांतने दिल्लीचा विजय साकार केला.

दिल्लीने गुजरातचे टेन्शन वाढवले

गुजरातने दिल्लीला 130 धावांमध्ये गुडाळले खरे मात्र दिल्लीने देखील झुंजारपणा दाखवत गुजरातची हवा टाईट केली होती. त्यांनी गुजरातची अवस्था 3 बाद 26 धावा अशी करून ठेवली होती. खलील अहदमने वृद्धीमान साहाला शुन्यावर नॉर्त्जेने शुभमन गिलला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या विजय शंकरचा इशांत शर्माने 6 धावांवर असताना त्रिफळा उडवला. यानंतर डेव्हिड मिलरही भोपळाही न फोडता माघारी परतला. त्याचा कुलदीप यादवने त्रिफळा उडवत गुजरातची अवस्था 4 बाद 32 धावा अशी अवस्था केली.

109-6 (17.1 Ov) : अमन हकीम खानचे अर्धशतक

मोहम्मद शमीने दिल्लीची अवस्था 5 बाद 23 धावा अशी केल्यानंतर अक्षर पटेल आणि अमन हकीम खान यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत दिल्लीची लाज वाचवण्याचा प्रयत्न केला. ही जमलेली जोडी शतकी मजल मारून देणार असे वाटत असतानाच मोहित शर्माने 30 चेंडूत 27 धावा करणाऱ्या अक्षर पटेलला बाद केले.

अक्षर बाद झाल्यानंतर अमनने डावाची सूत्रे आपल्या खांद्यावर घेत दिल्लीला शतकी मजल मारून दिली. त्याला रिपल शर्माने आक्रमक साथ दिली. दरम्यान, त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र अर्धशतकानंतर (51) राशिद खानने त्याचा अडसर दूर करत दिल्लीला 126 धावांवर 7 वा धक्का दिला. यानंतर डावाचे शेवटच्या षटकात मोहित शर्माने चांगले स्लोअर वन टाकत फक्त 3 धावा दिल्या. त्याने रिपल शर्माला 23 धावांवर बाद करत आपली 100 वी आयपीएल विकेट देखील साजरी केली.

23-5 : शमीपुढे दिल्लीची सपशेल शरणागती

गुणतालिकेतील तळात असलेल्या दिल्लीचा उरला सुरूला आत्मविश्वास आज मोहम्मद शमीने घालवून टाकला. गुजरातने दिल्लीला पहिल्या 5 षटकात 5 धक्के दिले. यातील 4 विकेट्स एकट्या मोहम्मद शमीने घेतल्या. तर कर्णधार डेव्हिड वॉर्नर 2 धावा करून धावबाद झाला. शमीने सॉल्टला पहिल्या चेंडूवर शुन्यावर बाद केले. त्यानंतर रिले रूसोला 8 तर मनिष पांडेला 1 धावेवर बाद केले. पाठोपाठ पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रियम गर्गला 10 धावांवर बाद करत आपली चौथी शिकार केली. शमीने दिल्लीची अवस्था 5 षटकात 5 बाद 23 धावा अशी केली.

मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर दिला धक्का

मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर फिल्प सॉल्टला बाद करत धक्का दिला.

दिल्लीने नाणेफेक जिंकली

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT