GT vs KKR IPL 2024  ESAKAL
IPL

GT vs KKR IPL 2024 : पावसाने गुजरातला बुडवलं; प्ले ऑफच्या रेसमधून पडली बाहेर, केकेआर मात्र फायद्यात

अनिरुद्ध संकपाळ

GT vs KKR IPL 2024 : पावसामुळं गुजरातनं गाशा गुंडाळला; नाणेफेक न होताच सामना झाला रद्द

अहमदाबादमध्ये आलेल्या वादळी पावसात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना वाहून गेला. सामना रद्द झाल्याने गुजरात टायटन्स अधिकृतरित्या आयपीएल 2024 च्या प्ले ऑफमधून बाहेर पडली आहे.

GT vs KKR Live Score IPL 2024 : पावसाचा जोर कायम, गुजरात - केकेआर सामन्यावर संकट

अहमदाबादमध्ये अजून पाऊस पडत असल्याने सामन्यावर संकट निर्माण झाले आहे. साधारणपणे प्रत्येकी 5 षटकांचा सामना होणार की नाही हे 10.56 ला समजणार आहे. अजून यासाठी खूप वेळ असला तरी तुफान पावसामुळे मैदान ओलं असेल तर सामना रद्द देखील होऊ शकतो.

अहमदाबादमध्ये डस्ट स्टॉर्म अन् जोरदार पाऊस 

अहमदाबादमध्ये डस्ट स्टॉर्म आणि जोरदार पाऊस पडल्याने केकेआर विरूद्ध गुजरात सामना होणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. जर सामना पावासमुळे रद्द झाला तर त्याचा मोठा फटका गुजरात टायटन्सला बसणार आहे. कारण केकेआर आधीच प्ले ऑफमध्ये पोहचली आहे.

GT vs KKR : हेड टू हेड 

गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. त्यातील 2 सामने गुजरातने तर एक सामना केकेआरने जिंकला आहे.

Gujarat Titans Vs Kolkata Knight Riders Wash Out : गुजरात टायटन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना पाण्यात  

आयपीएलचा 63 वा सामना हा गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. मात्र वादळी पावसामुळे हा रद्द करावा लागला. सामन्याची नाणेफेकही झाली नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला.

याचबरोबर गुजरात टायटन्सचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले. तर एक गुण हा केकेआरच्या पथ्यावर पडला आहे. ते आता प्ले ऑफसाठी पहिल्या दोन क्रमांकावर राहून पात्र होणार आहेत. आता सहा संघात प्ले ऑफचे तिकीट मिळवण्यासाठी टक्कर असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RJD Candidate Arrested : उमेदवारी अर्ज दाखल करताच 'राजद'च्या उमेदवारास झारखंड पोलिसांनी केली अटक!

Deglur Accident : बस व ट्रॅव्हल्स समोरासमोर अपघात २८ जण गंभीर जखमी, लेंडी पुला जवळील घटना; २ तास वाहतूक खोळंबंली

'२०२७ वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर आगरकर - गंभीरला पदावरून हटवा!', Navjot Singh Sidhu खरंच असं म्हणाले? स्वत:च केला खुलासा

Diwali Celebration : ऑपरेशन पहाट; सोलापूर पोलिसांनी पारधी कुटुंबांसोबत साजरी केली दीपावली, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Actor Asrani Passes Away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT