Harbhajan Singh on Hardik Pandya IPL 2024 sakal
IPL

Hardik Pandya IPL 2024 : 'हार्दिक पांड्याला कर्णधार बनवणे...' मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराचं धक्कादायक वक्तव्य

Harbhajan Singh on Hardik Pandya IPL 2024 : हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेऊन त्याच्याकडे नेतृत्व देण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय त्यांच्यावर उलटला.

Kiran Mahanavar

Harbhajan Singh on Hardik Pandya IPL 2024 : हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेऊन त्याच्याकडे नेतृत्व देण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय त्यांच्यावर उलटला. एकसंध संघ म्हणून त्यांची कामगिरी यंदा झाली नाही, असे थेट मत मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार आणि खेळाडू हरभजन सिंगने व्यक्त केले आहे.

पाच वेळा आयपीएल करंडक उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी यंदाची ही स्पर्धा फारच निराशाजनक ठरली. १० संघांत त्यांना दहाव्या क्रमांकावर राहावे लागले. मूळचा मुंबई संघातील खेळाडू; पण गेल्या दोन वर्षांत गुजरात संघातून खेळलेल्या हार्दिकला मुंबई संघ व्यवस्थापनाने आपल्या संघात तर आणलेच; पण रोहित शर्माला दूर करून त्याच्याकडे कर्णधारपद दिले. सोशल मीडियावर या निर्णयाविरुद्ध रान उठले होते. आणि मुंबईच्या प्रत्येक सामन्याच्या वेळी याचे पडसाद स्टेडियममध्ये उमटत होते.

यंदाच्या मोसमातील मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना हरभजन म्हणतो. मुंबईचा संघ एकसंध वाटला नाही. हार्दिकला कर्णधारपद देण्याचा निर्णय पुढच्या वर्षीही घेता आला असता; परंतु या सर्व बदलात हार्दिकचा दोष नव्हता.

मुंबई संघातून मी १० वर्षे खेळलो आहे. हा संघ मोठा आहे. संघ व्यवस्थापनही फार मोठे आहे आणि ते संघालाही तेवढ्याच सक्षमपणे तयार करत असतात; परंतु यावेळी त्यांनी कदाचित जास्त पुढचा विचार केला असेल आणि तोच त्यांच्या मुळावर आला असेल. संघ जेव्हा एकसंध नसतो तेव्हा अशा अपयशाचा सामना करावा लागणे हे अपेक्षित असते; पण मुंबईसारख्या संघाची अशाप्रकारे अवस्था होते हे पाहून मला फार दुःख झाले, अशी भावना हरभजनने व्यक्त केली.

गुजरात संघात दोन्ही वर्षांत अंतिम फेरी गाठून देणाऱ्या हार्दिकला स्वतः फलंदाजी आणि गोलंदाजीतही अपयश आले. मुळात तो दुखापतीनंतर प्रदीर्घ काळानंतर खेळत होता. १४ सामन्यांत मिळून त्याला १८.०० च्या सरासरीने केवळ २१६ धावाच करता आल्या आणि गोलंदाजीत ३५.१८ च्या सरासरीने केवळ ११ विकेटच मिळवता आल्या. प्रत्येक षटकात त्याने १०.७५ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या.

वेगळा हार्दिक दिसून येईल

आयपीएलमध्ये अपयश आले तरी येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेगळा हार्दिक पंड्या दिसून येईल, हार्दिक हा चांगला अष्टपैलू आहे. भारतीय संघाची जर्सी परिधान केल्यावर एक वेगळी ऊर्जा असलेला हार्दिक मैदानावर उतरतो, असे हरभजन म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT