Hardik Pandya - Sanju Samson Sakal
IPL

Sanju Samson: 'सॅमसनला रोहितनंतर भारताचा टी20 कर्णधार म्हणून तयार करावं', असं कोण म्हणालं?

Sanju Samson Captaincy: आयपीएलच्या 17 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना संजू सॅमसनने शानदार कामगिरी केली असून सध्या त्याचे कौतुक होत आहे.

Pranali Kodre

Sanju Samson News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सोमवारी (22 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना झाला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

राजस्थानच्या विजयात यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांनी नाबाद भागीदारी केली होती. तसेच जैस्वालने शतकी खेळी केली, तर सॅमसनने फलंदाजीबरोबरच्या त्याच्या यष्टीरक्षण आणि नेतृत्वाने या सामन्यात प्रभाव पाडला. त्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने त्यांचे कौतुक केले आहे.

खरंतर जैस्वालने आयपीएल 2024 मध्ये पहिल्या सात सामन्यात मोठी खेळी केली नव्हती. परंतु, त्याने मुंबईविरुद्ध शानदार पुनरागमन करत 60 चंडूत 104 धावांची नाबाद खेळी केली. तसेच सॅमसनच्या नेतृत्वात यंदा राजस्थानने पहिल्या 8 सामन्यांत 7 विजय मिळवले आहेत. याबाबत सोमवारच्या सामन्यानंतर हरभजन सिंगने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

त्याने लिहिले, 'यशस्वी जैस्वालची खेळी हे सिद्ध करते की फॉर्म हा तात्काळ आहे, पण दर्जा चिरकालीन असतो.आणि संजू सॅमसन ज्याप्रकारचा यष्टीरक्षक फलंदाज आहे, त्याबाबत काही शंकाच नाही.'

'संजू सॅमसन टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात यायल हवा आणि त्याला रोहित शर्मानंतर भारताचा पुढचा टी20 कर्णधार म्हणून तयार करायला पाहिजे. यात काही शंका आहे का?'

दरम्यान, हरभजनच्या या पोस्टवर अनेक युजर्सने कमेंट्स केल्या आहेत.

सामन्याबद्दल सांगयचे झाले तर मुंबईने राजस्थानसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले होत, ज्याचा पाठलाग राजस्थानने 18.4 षटकात पूर्ण केला. राजस्थानकडून जयस्वालच्या शतकाव्यतिरिक्त जॉस बटलरने 35 आणि सॅमसनने नाबाद 38 धावांची खेळी केली. मुंबईकडून एकमेव विकेट पीयुष चावलाने घेतली.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 9 बाद 179 धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने 45 चेंडूत 65 धावांची खेळी केली, तर नेहल वढेराने 24 चेंडूत 49 धावांची खेळी केली.राजस्थानकडून गोलंदाजीत संदीप शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. (Harbhajan Singh Said Sanju Samson Should Groomed as Next T20 Captain After Rohit Sharma)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT