harbhajan singh-sreesanth-fights-again-video-ipl-2023-rishabh-pant cricket news in marathi kgm00 
IPL

IPL 2023 : भज्जी-श्रीशांतचं लिफ्टमध्ये पुन्हा झाले भांडण, ऋषभ पंतने शेअर केला व्हिडिओ

Kiran Mahanavar

IPL 2023 : आयपीएलमध्ये अनेक वाद झाले आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे हरभजन सिंग आणि श्रीशांत यांच्यातील कानाखाली मारण्याची घटना. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने पंजाबचा वेगवान गोलंदाज श्रीशांतला कानाखाली मारली होती.

या भांडणामुळे हरभजन सिंगला मोठे नुकसान सहन करावे लागले आणि नंतर त्याने श्रीशांतची माफीही मागितली. मात्र आता पुन्हा एकदा या दोन खेळाडूंमध्ये हाणामारी झाली आहे. त्याचा व्हिडिओ ऋषभ पंतने शेअर केला.

अरे काळजी करू नका ही भांडण प्रत्यक्षात घडलेली नाही, दोन्ही खेळाडू एका अॅड शूटमध्ये एकमेकांशी भिडले. लिफ्टमध्ये श्रीशांत आणि हरभजन सिंग एका शब्दावरून एकमेकांमध्ये अडकले आणि यादरम्यान एक मुलगीही तिथे उभी असलेली दिसत आहे. ऋषभ पंतने हरभजन सिंग आणि श्रीशांतच्या 'फाईट'चा व्हिडिओ शेअर केला आहे. यात पंतने भज्जी आणि पंत पुन्हा भांडले, असे कॅप्शन लिहिले आहे.

चांगली गोष्ट म्हणजे जाहिरात शूटमध्येच हे घडले आहे. खऱ्या आयुष्यात दोघे खूप चांगले मित्र आहेत. अलीकडेच आयपीएलच्या कॉमेंट्रीदरम्यान वीरेंद्र सेहवागने भज्जी आणि श्रीसंतसमोर त्या घटनेचा उल्लेख केला होता. श्रीशांत आणि हरभजन सिंग सध्या आयपीएल 2023 ची कॉमेंट्री एकत्र करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT