Hardik Pandya Video Sakal
IPL

Hardik Pandya: आधी शंकरभक्ती अन् आता कृष्णाच्या चरणी! हार्दिक पांड्याचा Video व्हायरल

Hardik Pandya Video: मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या ईश्वर भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसून आले आहे. त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Hardik Pandya Video: मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या ईश्वर भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सोमनाथ मंदिरात जाऊन महादेवाची पुजा केली होती आणि तो कृष्ण भक्तीत लीन झाल्याचे दिसले आहे.

नुकताच हार्दिकचा मोठा भाऊ आणि सध्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळणाऱ्या कृणाल पांड्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने कृतज्ञ असे कॅप्शन दिले आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की हार्दिक आणि कृणाल हे माईकवर 'हरे कृष्णा, हरे रामा' अभंग गात आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबिय देखील तिथे उपस्थित असून सर्वांनी पारंपारिक वेशभूषा केली आहे. हा व्हिडओ एका पुजेतील असावा, असा कयास आहे.

या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सकडून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. एकाच दिवसात या व्हिडिओला 12 लाखांहून अधिक लाईक्स आल्या आहेत.

हार्दिक करतोय संघर्ष, तर कृणालची शानदार कामगिरी

हार्दिकला सध्या मैदानात आणि मैदानाबाहेरही संघर्ष करावा लागत आहे. त्याला मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 आधी गुजरात टायटन्सकडून ट्रेड करत पुन्हा संघात घेतले आणि रोहित शर्माला हटवून त्याला कर्णधारपदही दिले.

त्यामुळे चाहत्यांमध्ये मात्र नाराजी असून त्यामुळे हार्दिक सातत्याने ट्रोल होत आहे. त्यातच त्याची कामगिरीही फारशी चांगली झालेली नाही. तसेच त्याच्या नेतृत्वात मुंबईला पहिल्या तिन्ही सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर चौथ्या सामन्यात मुंबईने पहिला विजय मिळवला.

याशिवाय कृणाल पांड्याची कामगिरी मात्र चांगली झाली आहे. तो आयपएलमध्ये फलंदाजीला आल्यानंतर आत्तापर्यंत 4 सामन्यात बाद झालेला नाही. त्याने पंजाब किंग्सविरुद्ध 43 धावांनी नाबाद खेळीही केली होती. तसेच त्याने किफायतशीर गोलंदाजीही केली असून गुजरात टायटन्सविरुद्ध 11 धावांतच 3 विकेट्सही घेतल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तीन दिवसांत पंतप्रधान मोदींची माफी मागा, अन्यथा.... ; संसदीय स्थायी समितीचा मार्क झुकरबर्ग यांना थेट इशारा

'आज मौनव्रत आहे!' पत्रकारांच्या प्रश्नांवर रवी किशन यांचं भन्नाट उत्तर, म्हणाले...'पंडित जी ने आज मौन...'

मुख्य अभिनेत्याने सोडली 'लक्ष्मी निवास' मालिका; तर एक- दोन नव्हे तब्बल तीन कलाकारांची एंट्री; कोण आहेत ते?

Jalna District Bank: जालना जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी राहुल लोणीकर; व्हाईस चेअरमनपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड

Career Guide: नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे? जाणून घ्या कोर्सेस, पात्रता, NEET आणि प्रवेश प्रक्रिया!

SCROLL FOR NEXT