Hardik Pandya Injured IPL 2023 esakal
IPL

Hardik Pandya Injured : मुंबईविरूद्ध नाही केली गोलंदाजी; हार्दिक पांड्याला पुन्हा झाली दुखापत?

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Injured IPL 2023 : आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत सध्या 16 गुण घेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरातला मुंबईविरूद्धच्या सामन्यात 27 धावांनी पराभव स्विकारावा लागला. मुंबईने सामना जिंकला असला तरी गुजराजच्या पहिल्या स्थानाला कोणताच धक्का पोहचला नव्हता. मात्र या सामन्यात गुजरातच्या चाहत्यांसाठी एक चिंता वाढवणारी गोष्ट घडली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने मुंबईविरूद्ध एकही षटक गोलंदाजी केली नाही. मोहम्मद शमीसोबत मोहित शर्माने नवीन चेंडू टाकल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

हार्दिक पांड्याने मुंबईविरूद्धच्या सामन्यात एकही षटक गोलंदाजी न करण्याचा निर्णय हा रणनितीनुसार घेण्यात आला होता की यामागे काहीतरी गंभीर कारण होतं अशी चर्चा सुरू झाली. आता या चर्चेला गुजरात टायटन्सच्या सहाय्यक कोच आशिष कपूरने उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की मुंबईविरूद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या पाठीचा स्नायू ताणला गेला होता.

गुजरातने मुंबईविरूद्ध पाच गोलंदाजांचा वापर केला. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी नवीन चेंडू टाकला तर मधल्या षटकात राशिद खान आणि नूर अहदमने गोलंदाजी करण्याची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर अल्झारी जोसेफने स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी केली.

गुजरातचे सहाय्यक कोच आशिष कपूर यांनी सांगितले की सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या पाठीचा स्नायू ताणला गेला. त्यामुळे त्याने धोका न पत्करता गोलंदाजी न करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याला पाठीत थोडा स्टिफनेस जाणवत होता. गुजरातच्या दृष्टीने हार्दिक पांड्याचा फिटनेस हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्यामुळे यावर त्वरित निर्णय घेऊन हार्दिकला गोलंदाजी करण्यापासून रोखण्यात आले. जरी तो दुखापतग्रस्त असला तरी त्याने फिल्डवर जाऊन क्षेत्ररक्षण केले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News :दीक्षाभूमी विकासाच्या संथ गतीवर उच्च न्यायालयाचा संताप; आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

Satara Rare Softshell Turtle : निसर्गाची किमया! साताऱ्यात आढळले मऊ पाठीचे आणि लांब मानेचे दुर्मीळ कासव; वाघाप्रमाणं मिळतंय कायदेशीर संरक्षण, वैशिष्ट्ये काय?

MPSC Success Story: आईने खानावळ चालवली, वडील माथाडी कामगार; लेकीने MPSCत गाजवले नाव, विशाखा शिर्केंची प्रेरणादायी यशोगाथा

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

SCROLL FOR NEXT