Hardik Pandya  esakal
IPL

Hardik Pandya : शिक्कामोर्तब! हार्दिकला मुंबई इंडियन्समध्ये परत आणल्यानंतर आकाश अंबानी काय म्हणाला? 

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Returns In Mumbai Indians : आयपीएल 2024 च्या रिटेंशन यादी जाहीर करण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात हार्दिक पांड्याच्या ट्रेड ऑफवरून खूप गोंधळ झाल्याचे पहावयास मिळाले. गुजरातने हार्दिकला रिटेन केलं अशी देखील बातमी आली. मात्र शेवटचे काही तास शिल्लक असताना एमआयने मोठा खेळ केला अन् हार्दिकचं ट्रेड ऑफ घडवून आणलं.

आता या व्यवहारावर मुंबई इंडियन्सने शिक्कामोर्तब केलं आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आकाश अंबानींची पहिली प्रतिक्रिया पोस्ट केली आहे.

हार्दिक पांड्याला पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये आणल्यानंतर आकाश अंबानी म्हणतात, 'हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये परतल्याचे पाहून खूप आनंद झाला आहे. त्याची घरवापसी झाली आहे. तो संघाचा समतोल सांभाळणारा उत्कृष्ट खेळाडू आहे. हार्दिकची मुंबई इंडियन्ससोबतची पहिली इनिंग खूप यशस्वी होता. आता त्याची दुसरी इनिंग देखील त्यापेक्षा जास्त यशस्वी असेल अशी आशा करूयात.'

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानींनी देखील प्रतिक्रिया दिली. 'हार्दिक पांड्याच्या घरी परत येण्यामुळे आम्ही खूप उत्साही झालो आहोत. मुंबई इंडियन्सच्या कुटुंबांचे रियुनियन हे ह्रदयस्पर्शी आहे.'

'मुंबई इंडियन्सचा युवा प्रतिभाशाली खेळाडू ते भारतीय संघाचा स्टार! हार्दिकने मोठी झेप घेतली आहे. हार्दिक पांड्या भविष्यात मुंबई इंडियन्ससाठी अजून कोणती भन्नाट कामगिरी करतोय हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.'

हार्दिक पांड्या जरी मुंबई इंडियन्समध्ये परतला असला तरी त्याची टीमचं नेतृत्व करण्याची मनिषा कोणापासून लपून राहिलेली नाही. अशा परिस्थिती रोहित शर्माकडून संघाचे नेतृत्व कशा पद्धतीने हार्दिक पांड्याकडे सोपवले जाईल याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. तो या हंगामात रोहितचा डेप्युटी म्हणून काम करेल.

हार्दिक पांड्याने जरी गुजरातला पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिलं असलं तरी मुंबईमध्ये रोहित शर्माने तयार केलेली लेगसी सांभाळणं मोठं आव्हान असणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT