Hardik Pandya on Yash Dayal  
IPL

Hardik Pandya IPL 2023: कर्णधार पांड्या चिंतेत! 5 चेंडूत 5 षटकार खाल्ल्यानंतर यशची तब्येत बिघडली; 9 किलो वजन...

Kiran Mahanavar

Hardik Pandya on Yash Dayal : गुजरात टायटन्स संघाने मंगळवारी मुंबई इंडियन्सचा पराभव करत मोसमातील पाचवा विजय मिळवला. गतविजेते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. संघाला विजय मिळाला मात्र कर्णधार हार्दिक पांड्या नाराज दिसला. त्यांच्या नाराजीचे कारण गुजरातचा गोलंदाज यश दयाल.

मंगळवारी झालेल्या सामन्यात यश दयाल दिसला नाहीत. याआधीही त्याला संधी मिळाली नव्हती. सामन्यानंतर हार्दिक पांड्याला यश दयालबद्दल प्रश्न विचारण्यात आला. गुजरातच्या कर्णधाराने म्हणाला की, केकेआरविरुद्धच्या सामन्यापासून यशची तब्येत खराब आहे. 10 दिवसात त्याने आठ ते नऊ किलो वजन कमी केले आहे पण तो खूप मेहनत घेत आहे. तो लवकरच परत येईल.

हार्दिकच्या वक्तव्यापूर्वी यशला गुजरातच्या प्लेइंग-11 मधून दबावाची परिस्थिती हाताळता न आल्याने त्याला बाहेर ठेवण्यात आल्याचे मानले जात होते. या मोसमात त्याची कामगिरीही चांगली झाली नाही. आयपीएल 2023 च्या तीनही सामन्यांमध्ये तो दिसला पण त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

केकेआरविरुद्धच्या सामन्याने त्याची संपूर्ण लय बिघडवली. त्या सामन्याच्या शेवटच्या षटकात केकेआरला 29 धावांची गरज होती. त्या सामन्यात हार्दिक कर्णधार नव्हता. राशिद खान कडे संघाची धुरा होती. त्याने यश दयालकडे चेंडू सोपवला. रिंकू सिंगने षटकातील शेवटच्या पाच चेंडूंमध्ये पाच षटकार ठोकत आपल्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

हा 25 वर्षीय तरुण गोलंदाज गेल्या मोसमात गुजरात टायटन्ससाठी महत्त्वाचा गोलंदाज ठरला. यशने IPL 2022 मध्ये 9 सामन्यात 11 विकेट घेतल्या. गेल्या हंगामातही त्याचा इकॉनॉमी रेट जास्त होता. त्याने एका षटकात 9 पेक्षा जास्त धावा लुटल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MHADA Housing Lottery : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

Tamhini Ghat Accident : स्वप्नांची भरारी अर्धवट ठेवून सहा तरुणांना काळाने गाठलं

समझो हो गया...! Smriti Mandhana ने एकदम स्टाईलमध्ये दाखवली एंगेजमेंट रिंग! जेमिमा रोड्रिग्सने शेअर केला Video

स्टार प्रवाहला आणखी एक धक्का? 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून ईशा केसकरची एक्झिट? नव्या प्रोमोमुळे चर्चेला उधाण

Pune News : दौंड–इंदापूरमध्ये बनावट मद्याचा भंडाफोड; तीन लाखांचा साठा जप्त; तीन तरुणांना अटक!

SCROLL FOR NEXT