Hardik Pandya GT vs CSK IPL 2023  
IPL

GT vs CSK : 'आयुष्यात पश्चाताप करणे...' सामना गमावल्यानंतर पांड्या संतापला! सांगितलं नेमकं कुठं चुकलं

Kiran Mahanavar

Hardik Pandya GT vs CSK IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग सीझन 16 मध्ये मंगळवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला. यासोबत चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. सीएसकेविरुद्धच्या पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या निराश दिसत होता.

हार्दिक पांड्याने आपल्या संघाकडून काही मोठ्या चुका झाल्याची कबुली दिली. गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणाला, “आम्ही गोलंदाजीत खूपच सरस होतो. पण काही चुका महागात पडल्या. आमच्या गोलंदाजांनी 15 धावा जास्त खर्च केल्या. बर्‍याच प्रमाणात आम्ही खूप योग्य गोष्टी केल्या. मध्यंतरी आमची गोलंदाजी चांगली होती. आम्ही आमच्या योजना राबवत होतो.

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, आम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. आम्हाला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे. आम्ही त्यावर लक्ष केंद्रित करू. हा हंगाम आमच्यासाठी खूप चांगला गेला आहे.

पांड्या धोनीचे जोरदार कौतुक करत म्हणाला, “धोनीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचा गोलंदाजांचा वापर. ते ठरवतात की विजयाची नोंद करण्यासाठी तुम्हाला 10 अतिरिक्त धावा कराव्या लागतील. जर आम्ही पुढचा सामना जिंकण्यात यशस्वी झालो तर अंतिम फेरीत सीएसकेचा सामना करण्यापेक्षा काहीही चांगले असू शकत नाही.

पुढे तो म्हणाला, आयुष्यात पश्चाताप करणे चांगले नाही. आम्ही 15 धावा अधिक खर्च केल्या आणि आम्ही फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करू शकलो नाही. दोन दिवसांनी पुनरागमन करून अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचा विचार करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway Traffic Jam : कोकणात जाणाऱ्यांची लगबग; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लाब रांगा...

आता पोस्टमनही म्युच्युअल फंड विकणार! पोस्ट ऑफिस Mutual Funds चे नवे हब बनणार; ग्रामीण गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

जन्माष्टमीला बाळाला कृष्ण केलं, तीन दिवसांनी नदीत उडी; चौथ्या दिवशी पतीने बाळासह तिथंच घेतली जलसमाधी....

Ganesh Chaturthi 2025: भारतभर गाजणारा बाप्पांचा जल्लोष! जाणून घ्या विविध राज्यांतील खास गणेशोत्सवाच्या परंपरा

Latest Marathi News Updates : सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला तरुण अखेर सापडला

SCROLL FOR NEXT