Hardik Pandya esakal
IPL

Hardik Pandya VIDEO : मुंबई इंडियन्सचा कर्णधार होताच पांड्यासाठी 'राजेशाही' थाट, जामनगरमध्ये जंगी स्वागत

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा अफगाणिस्तानविरूद्धची टी 20 मालिकेला मुकणार असल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून मिळाले आहे. मात्र हार्दिक पांड्या हा आयपीएलपर्यंत पूर्णपणे फिट होईल असं सांगितलं जात आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हार्दिक पांड्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ राजेशाही स्वागत झाल्याचं दिसतंय.

हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर पहिल्यांदाच जामनगरच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये पोहचला. यावेळी रिलायन्सच्या गेटवर हार्दिकचे शाही स्वागत करण्यात आलं. हे स्वागत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

जामनगरच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मेन गेटवर हार्दिकचे घोडस्वारांच्या ड्रीलने स्वागत करण्यात आलं. त्यानंतर या घोडस्वारांनी हार्दिकला एस्कॉट केलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्या 2021 मध्ये मुंबई इंडियन्स सोडून गुजरात टायटन्समध्ये दाखल झाला होता. गुजरातचे नेतृत्व करताना हार्दिकने पहिल्याच सत्रात विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर गेल्या हंगामात आयपीएलची फायनल गाठून दिली.

आता आयपीएल 2024 च्या हंगापूर्वी हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. मुंबईने हार्दिकला गुजरातकडून ट्रेड करून आपल्या गोटात खेचलं. यासाठी मुंबई इंडियन्सने गुजरातला 15 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम दिली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai vs Vidarbha T20: आयुष म्हात्रे ऑन फायर! ८ षटकारांसह शतक अन सूर्या-दुबेची साथ; मुंबईचा विदर्भाविरुद्ध मोठा विजय

Mumbai Water Supply: मुंबईत १ आणि २ डिसेंबरला पाणी संकट! 'या' भागात पाणीपुरवठा विस्कळीत राहणार; तुमचा परिसर यादीत आहे का?

Aquarius Love Horoscope 2026: मार्च, जून अन् ऑक्टोबरचे गुरु गोचर बदलतील तुमची लव लाइफ; 2026मध्ये असं असेल कुंभ राशीचं भविष्य

School Holiday: राज्यात 5 डिसेंबरला सर्व शाळा बंद राहणार; जाणून घ्या कारण काय

Latest Marathi News Live Update: दहिसर परिसरात अनेक घरांमध्ये चोरी, सीसीटीव्ही फुटेज समोर

SCROLL FOR NEXT