Hardik Pandya Record | IPL 2022 News Updates sakal
IPL

IPL 2022: पांड्याकडे 5 खणखणीत स्ट्रोकमध्ये 'दुहेरी शतक' करण्याची संधी

आजच्या सामन्यात हार्दिक पांड्याला षटकारांचा विक्रम करण्याची संधी

Kiran Mahanavar

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामात, आज गुजरात टायटन्स (GT) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघ एकमेकांसमोर आसणार आहे. या आयपीएलला दोन्ही नवे संघ आहेत आणि त्यांचा पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहे. गुजरात संघाची कमान स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे आहे, तर केएल राहुल लखनऊ संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. आजच्या सामन्यात हार्दिक पांड्याला षटकारांचा विक्रम करण्याची संधी आहे. (Hardik Pandya Record)

हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 92 सामने खेळले असून त्यात त्याने 98 षटकार मारले आहेत. लखनौ संघाविरुद्ध त्याने आणखी दोन षटकार खेचले तर त्याचे षटकारांचे 'शतक' पूर्ण होईल. अशाप्रकारे आयपीएलमध्ये 100 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हार्दिकचा समावेश होईल.(IPL 2022 News Updates)

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 25 खेळाडूंनी 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. यामध्ये 15 भारतीयांचा समावेश आहे. षटकार ठोकणारा हार्दिक हा १६वा भारतीय आणि एकूण २६वा खेळाडू ठरेल. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. 142 सामन्यात 357 षटकार मारले आहेत. रोहित शर्मा भारतीयांमध्ये आघाडीवर असून, त्याने आतापर्यंत 214 सामन्यांत 229 षटकार ठोकले आहेत.

हार्दिक पांड्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 92 सामने खेळले असून त्यात त्याने 1476 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ अर्धशतके केले आहेत. हार्दिकने आतापर्यंत आयपीएलमध्ये 97 चौकार मारले आहेत. अशा स्थितीत त्याला चौघांचे 'शतक' पूर्ण करण्याची संधी आहे. हार्दिक गेल्या मोसमापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला होता. यावेळी त्याला मुंबईने कायम ठेवले नाही, त्यामुळे अहमदाबाद फ्रँचायझीने त्याला 15 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले आणि त्याला संघाचा कर्णधार बनवले. आयपीएलमधला हा हार्दिकचा दुसरा संघ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT