Hardik Pandya Statment on MI vs LSG IPL 2024 sakal
IPL

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Hardik Pandya Statment on MI vs LSG IPL 2024 : आयपीएल 2024 हा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वाईट हंगाम होता. संघाने शेवटच्या स्थानावर म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आपला हंगाम संपवला.

Kiran Mahanavar

Hardik Pandya Statment on MI vs LSG IPL 2024 : आयपीएल 2024 हा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वाईट हंगाम होता. संघाने शेवटच्या स्थानावर म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आपला हंगाम संपवला. या हंगामात मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार बनवले होते. जिथे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाला खूप टीकेला सामोरे जावे लागले.

मुंबई इंडियन्सने त्यांचा शेवटचा आयपीएल सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला. या सामन्यात लखनौ संघाने त्यांचा 18 धावांनी पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा पराभव हा त्यांचा या हंगामातील दहावा पराभव आहे. याआधी 2022 मध्ये त्यांना एकाच मोसमात 10 पराभवांना सामोरे जावे लागले होते. खराब हंगामातील शेवटच्या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पांड्या खूपच निराश दिसला आणि त्याने सामना संपल्यानंतर मोठे वक्तव्य केले.

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक पंड्या म्हणाला की, हा हंगामा खूप कठीण गेला. एक संघ म्हणून आम्ही दर्जेदार क्रिकेट किंवा स्मार्ट क्रिकेट खेळू शकलो नाही, ज्यामुळे संघाला संपूर्ण हंगामाचा फटका बसला. हे व्यावसायिक जग आहे. आम्ही कुठे चुकलो हे सांगणे कठीण आहे. कारण संपूर्ण हंगाम आमच्याकडून चुका झाल्या.

कसा झाला सामना?

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनऊ संघाने 18 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने 20 षटकांचा खेळ संपल्यानंतर 6 गडी गमावून 214 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाला 20 षटकांत 196 धावांपर्यंत मजल मारता आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT