Hardik Pandya  esakal
IPL

Hardik Pandya MI Captain : हार्दिक मुंबईचा नवा किंग; अखेर रोहितला बाजूला केलंच

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya MI Captain : अखेर हार्दिक पांड्या ज्या हेतूसाठी मुंबई इंडियन्स सोडून गेला अन् परत देखील आला तो हार्दिकचा हेतू पूर्ण झाला. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 चा कर्णधार म्हणून घोषित केलं आहे. तो आता रोहित शर्माचा उत्तराधिकारी असणार आहे.

मुंबई इंडियन्सचा ग्लोबल मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने घोषणा करताना ही मुंबई इंडियन्सने एका रणनितीनुसार हार्दिक पांड्याला कर्णधार केलं आहे. मुंबई इंडियन्सला भविष्यासाठी तयार करायचं आहे असेही जयवर्धने म्हणाला.

जयवर्धनेने सांगितले की, 'मुंबई इंडियन्सचं सुदैव आहे की त्या संघाला कायम दमदार नेतृत्व मिळालं आहे. सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग ते रिकी पाँटिंग अन् रोहितपर्यंत या सर्वांनी मुंबई इंडियन्सच्या यशात आपले योगदान दिले.'

'आम्ही कायम भविष्यातील संघ तयार करण्याच्या दृष्टीकोणातून कार्यरत असतो. त्यामुळेच हाच दृष्टीकोण ठेवून आयपीएलच्या 2024 च्या हंगामात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करेल.'

जयवर्धने यांनी रोहित शर्माच्या अद्वितीय नेतृत्वाबद्दल त्याचे आभार देखील मानले. तो म्हणाला की, रोहितच्या नेतृत्वामुळे संघाने फक्त यश मिळवलं नाही तर तो आयपीएलमधील एक सर्वोत्तम कर्णधार ठरला. जरी रोहित आता कर्णधार नसला तरी मुंबई इंडियन्सच्या भविष्यातील यशासाठी त्याचा अनुभव आणि मार्गदर्शन लाभेल अशी अपेक्षा करतो.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT