Hardik Pandya visibly frustrated during Delhi Capitals Batting esakal
IPL

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya visibly frustrated during Delhi Capitals Batting Video DC vs MI IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 10 धावांनी पराभव केला. दिल्लीनं मुंबईसमोर 258 धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने शेवटच्या षटकापर्यंत दिल्लीला गॅसवर ठेवलं. मात्र ते 20 षटकात 9 बाद 247 धावा करता आल्या. तिलक वर्माने 32 चेंडूत 63 धावा ठोकून झुंजार खेळ केला. हार्दिक पांड्याने 24 चेंडूत 46 धावा करत चांगली फलंदाजी केली मात्र तो संघाला विजयापर्यंत पोहचवू शकला नाही.

दरम्यान, दिल्ली फलंदाजी करत असताना मुंबईच्या गोलंदाजांनी खूप मार खाल्ला. खुद्द कर्णधार हार्दिक पांड्याने दोन षटकात 41 धावा दिल्या. मुंबईचे गोलंदाज मार खात असताना मैदानावर कायम हसत राहणारा हार्दिक पांड्या जाम भडकलेला दिसला.

दिल्ली कॅपिटल्सने मुंबईविरूद्ध पॉवर प्लेमध्ये बिनबाद 92 धावा ठोकल्यानंतर मुंबईने अखेर दिल्लीला पहिला धक्का दिला. 27 चेंडूत 84 धावा ठोकणारा जॅक फ्रासर मॅक्गर्क बाद झाल्यावर ऋषभ पंत क्रीजवर आला.

पंत आल्यानंतर गार्ड घेण्यासाठी वेळ लावत होता. त्यानंतर पांड्या जाम भडकला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पांड्या अंपायर्सकडे पंतच्या चेंडू खेळण्याबाबत दिरंगाई करत असल्याची तक्रार लाँग ऑनवरून करत होता.

पांड्या अंपायर्सना सांगत होता की पंत हे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा रिदम ब्रेक करण्यासाठी मुद्दाम करत आहे. जॅकचा हाणामारीनं आधीच वैतागलेल्या पांड्याचा हा आक्रमक अवरात पाहून चाहत्यांना देखील आश्चर्य वाटलं असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT